एक्स्प्लोर
नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित : लालूप्रसाद यादव
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊऩ नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.

पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांनी राजीनामा सुपूर्द केला. मात्र नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेऊऩ नितीश कुमारांचा राजीनामा पूर्वनियोजित असून त्यांच्यावरील आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. तसंच देशातील अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यावर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप नसल्याचंही लालूप्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमारांनी राजीनामा दिल्याचा आरोपही लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सीबीआयने केलेल्या छापेमारीनंतर, लालू आणि नितीश कुमार यांच्यातील संबंध ताणले होते. त्याचा शेवट आज नितीश कुमार यांच्या राजीनाम्याने झाल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे.
नितीश कुमार यांना आम्ही पाठिंबा दिला, त्यांना अडचणी आल्या त्या आम्ही दूरही केल्या, मात्र त्यांनी बिहारचं राज्य असं चालंवलं की त्यामुळे बिहारच्या जनतेला नितीश कुमारांनी चपराक मारली आहे. असं लालूप्रसाद यादव यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
नितीश कुमारांना माहित आहे की त्यांच्यावर हत्येसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर 302 आणि 307 चा गुन्हा दाखल आहे. 1991 साली हा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामध्ये त्यांच्या अडचणी वाढणार आहेत, त्यामुळेच भाजपसोबत सेटिंग करत नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे, असंही लालूप्रसाद यादव म्हणाले.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) :
- आरजेडी (लालू) – 80
- जेडीयू (नितीश कुमार) – 71
- काँग्रेस – 27
- भाजप – 53
- सीपीआय – 3
- लोक जनशक्ती पार्टी – 2
- राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
- अपक्ष – 4
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























