एक्स्प्लोर
गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार
नवी दिल्ली : विमानसेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात शिवसेना आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना सेवा नाकारणाऱ्या सर्व विमान कंपन्यांविरोधात शिवसेना लोकसभेत हक्कभंग आणणार आहे. त्यामुळे चप्पलमार खासदाराच्या पाठीशी शिवसेना उभी राहिल्याचं चित्र आहे.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलेनं मारहाण करणं शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना चांगलं महागात पडलं आहे. कारण एअर इंडियाच्या तक्रारीनंतर गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
त्याआधी देशातल्या प्रमुख एअरलाईन्स कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांना काळ्या यादीत टाकत, त्यांच्या विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत. कायद्यानुसार अशाप्रकार कोणत्याही प्रवाशाला तिकीट नाकारता येत नाही, हाच मु्द्दा उचलून धरत गायकवाड एअरलाईन्स कंपन्यांविरोधात हक्कभंग आणण्याची शक्यता आहे.
गायकवाडांना मुंबई गाठण्यासाठी ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसनं प्रवास करावा लागला. राजस्थानातील कोटा रेल्वे स्थानकावर पत्रकारांनी गायकवाडांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र गायकवाडांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावेळी रवींद्र गायकवाडांची पत्रकारांसोबत बाचाबाची देखील झाली. या प्रकरणावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देतील असं रवींद्र गायकवाड म्हणाले. अखेर वापीला उतरुन ते रस्ते मार्गाने उस्मानाबादला रवाना झाल्याची माहिती आहे.
एअर इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनं गायकवाड यांना कोणत्याही विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे. गायकवाड यांनी खरं तर विमानानेच प्रवास करण्याची भाषा केली होती. मात्र गायकवाड येणार म्हणून दिल्ली विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे गायकवाड विमानतळाकडे फिरकलेच नाही. रवी गायवाड यांनी एअर इंडियाविरुद्द तक्रार दिली. त्यात त्यांनी धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.
VIDEO: खा. रवींद्र गायकवाडांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद
विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली.
शिवसेनेकडून जाब
शिवसेना पक्षाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांना अधिकृत जाब विचारण्यात आला होता. दिल्ली विमानतळावर एअर इंडिया विमानात घडलेल्या प्रकाराबद्दल खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांची बाजू शिवसेना पक्षाकडे मांडली आहे. पक्षाने त्यांना या घटनेसंदर्भात समज दिलेली आहे.
शिवसेनेची पहिला प्रतिक्रिया
गायकवाडांनी हिंसक होणं योग्य नसल्याचं मत शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ‘गायकवाड यांनी असं करायला नको होतं. ते लोकप्रतिनिधी आहेत. खासदार असो, आमदार असो, मंत्री असो, कोणी इतक्या पटकन हिंसक होणं योग्य नाही.’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘या प्रकरणात कोणाची चूक आहे, हे पाहायला हवं. कोणी सुरुवात केली, हे बघणं महत्त्वाचं आहे’ असंही शिंदे म्हणाले. गायकवाडांवर कारवाई करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गायकवाड यांचा उद्दामपणा
आपल्याकडे एअर इंडियाचं तिकीट असून एअर इंडियाच्या विमानातूनच प्रवास करणार असल्याचं रवींद्र गायकवाडांनी स्पष्ट केलं होतं. तसंच मोदींचा एकेरी उल्लेख केल्यामुळंच आपण मारहाण केल्याचा दावा गायकवाडांनी केला. मात्र एअर इंडियाने गायकवाड यांचं विमान तिकीटच रद्द केलं.
भारतीय विमान संघाची बंदी
भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.
कोण आहेत रवींद्र गायकवाड?
– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत
– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.
संबंधित बातम्या
लोकप्रतिनिधींनी पटकन हिंसक होणं अयोग्य : एकनाथ शिंदे
पुन्हा त्याच विमानाने जाणार, एअर इंडियाने अडवून दाखवावं : गायकवाड
एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार
… म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड
शिवसेनेने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा पुतळा जाळला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement