एक्स्प्लोर
BMW च्या धडकेत उबर ड्रायव्हर ठार, 24 वर्षीय तरुण अटकेत
नवी दिल्ली : भरधाव बीएमडब्ल्यू कारने दिलेल्या धडकेत उबर कॅबच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पळ काढणाऱ्या बीएमडब्ल्यू चालकाला बेड्या ठोकण्यात अखेर यश आलं आहे. दक्षिण दिल्लीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला होता.
दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय शोएब कोहलीला अपघातानंतर 14 तासांनी अटक झाली आहे. शोएब वसंत विहारच्या दिशेने निघाला होता, त्यावेळी मुनिरका परिसरात त्याचं कारवरुन नियंत्रण सुटलं आणि त्याने व्हॅगन आर कारला धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती, की व्हॅगन आर काहीशी हवेत उडून 50 मीटर अंतर फरपटत गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला उबर चालक नझरुल इस्लाम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
शोएब गुरुग्राममधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू शोएबच्या आईच्या नावे नोंदणी केलेली आहे. आरोपीचे वडील एका प्रख्यात खाजगी रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागातून निवृत्त झाल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement