Tata Steel Plant Fire : जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोटानंतर भीषण आग, दोन कर्मचारी जखमी
Tata Steel Plant Fire : झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टिल कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
Tata Steel Plant Fire : झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टिल कंपनीच्या प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर प्लांटमध्ये भीषण आग लागली. या आगीत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज सकाळी दहा वाजून 20 मिनिटांनी झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टिलच्या प्लांटमध्ये स्फोट झाला. स्टोटानंतर प्लांटमध्ये गॅस लिकेज झाला. त्यामुळे आणखी आग भडकली. त्यामुळे परिसरातील लोकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटानांमध्ये वाढ झाली आहे. वणवा पेटण्यासह काही कंपन्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज काल आणि आज सलग दोन दिवस मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. तर काल नाशिकमध्येही 30 ते 40 एकरावर आग लागल्याची घटना घडली आहे.
#WATCH Jharkhand | A fire broke out in a Coke plant of Tata Steel Factory in Jamshedpur due to an alleged blast in a battery. Five fire tenders at the spot, 2 labourers reportedly injured. pic.twitter.com/Y7cBhVSe1A
— ANI (@ANI) May 7, 2022
नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. काल दुपारच्या सुमारास लागलेली ही आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. या आगीत दोन कामगार बेपत्ता झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिकमध्येही पेटला वणवा
काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नाशिक येथील मौजे ओझर येथील विमानतळा शेजारी आग लागली. अंदाजे 40 ते 50 एकर जमिनीवरील गवताला आग लागल्यामुळे गवत जळून खाक झाले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसल्याचे एचएएल प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले. विमानतळ परिसरामध्ये असलेल्या या सोलर प्लांटचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
घटनास्थळी HAL यांच्या चार अग्निशामक दलाच्या गाड्या, नाशिक महानगरपालिका यांच्याकडील दोन आणि पिंपळगाव ग्रामपंचायत यांची एक गाडी तर सिन्नर नगरपालिकेच्या एका गाडीच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. सध्या ही आग पूर्णपणे विझली आहे.
दरम्यान, राज्यातही उष्णतेत वाढ झाली आहे. त्यातच आता 7 मे ते 11 मे दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, नागपुरात नागपुरात 9 मे ते 11 मे दरम्यान उष्णतेच्या लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात अग्नेय भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून 8 मे रोजीच्या संध्याकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानात पुढील 2-3 दिवसांत पुन्हा वाढ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील आगीचा आठ तास थरार, दोन कामगार बेपत्ता, तीन जखमी