एक्स्प्लोर

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील आगीचा आठ तास थरार, दोन कामगार बेपत्ता, तीन जखमी 

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील कंपन्यांना काल दुपारच्या सुमारास लागलेली ही आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. या आगीत दोन कामगार बेपत्ता झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत.

Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) पावणे एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. दुपारच्या सुमारास लागलेली ही आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. या आगीत दोन कामगार बेपत्ता झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अजूनपर्यंत कुलिंगचं काम सुरु आहे.

नवी  मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब या रासायनिक कंपनीला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या.पावणे एमआयडीस मध्ये लागलेली ही आग आठ ते नऊ तासानंतर नियंत्रणात आली. यानंतर अजूनपर्यंत केमिकल कंपनीत कुलिंगचे काम चालू आहे. सोबतच आजूबाजूला लागलेल्या कंपनीतील आग विझवण्यात देखील अग्निशमन विभागाला यश आलं आहे.

दरम्यान ही आग  एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या हलगर्जीपणामुळे आग वाढली असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक आणि माजी महापौरांनी केला आहे.  या विभागाकडे गाड्यांची कमतरता असून अनेक गाड्या खराब असल्याने घटनास्थळी गाड्या पोहोचण्यास उशीर झाला. तसेच फोम कमी असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला असल्याचं देखील बोललं जात आहे. एमआयडीसी मधील जवळपास 4 हजार कंपण्या रामभरोसे असल्याचा आरोप केला आहे. 

मित्राला व्हिडीओ कॉलवर आग दाखवली अन् तो बेपत्ता झाला 

या आगीत एक व्यक्ती जो बेपत्ता आहे. त्यांनी आग लागल्यानंतर आपल्या एका परदेशातील मित्रासोबत व्हिडीओ कॉल केला होता. निखिल पासीलकर असं या बेपत्ता व्यक्तिचं नाव आहे. ते त्यांच्या परदेशातील मित्रासोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते. त्यांच्या मित्राचा दावा आहे की तो बोलत असताना निखिलने त्याला आग दाखवली आणि अचानक फोन खाली पडला. त्या मित्राने निखिलच्या घरच्यांना कळवले.  कुटुंबीय त्याला फोन करत होते पण तो फोन उचलत नव्हता. नंतर संध्याकाळी त्यांच्या फोन बंद झाला. पासीलकर हे वेस्ट पोस्ट पॉलीकेमच्या प्रयोगशाळेत पर्यवेक्षक म्हणून काम करतात. पासिलकर हे कल्याणमध्ये राहतात आणि पालकांसह त्याचे संपूर्ण कुटुंब कंपनीच्या बाहेर थांबले आहे. निखिलच्या काकाने सांगितले की ते पोलिसांनाही भेटले पण ते त्यांना थांबायला सांगितलं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Dia Mirza Reaction On Diwali Controversy: दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
दिया मिर्झा प्रदूषण मुक्त दिवाळीच्या व्हिडीओनंतर जबरदस्त ट्रोल; आता म्हणाली, 'माझं काय चुकलं? सांगा...'
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Mumbai Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराकडून 3.25 कोटींची खंडणी; 50 कोटींच्या बिलांना मंजुरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गंडा, आरोपीला बेड्या

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल, पहिल्या तासातच शंभुराज देसाईंचा मोठा विजय, 42 वर्षांत जे घडलं नाही ते घडलं, भाजपच्या सत्यजितसिंह पाटणकर गटाला पराभवाचा धक्का
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल, शंभुराज देसाईंचा मोठा विजय, 42 वर्षांत जे घडलं नाही ते घडलं, भाजपच्या सत्यजितसिंह पाटणकर गटाला पराभवाचा धक्का
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Embed widget