एक्स्प्लोर
काँग्रेसच्या प्रचार रॅलीत स्फोट, तिघांचा मृत्यू, 10 जखमी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये काँग्रेसच्या प्रचार रॅली दरम्यान मोठी दुर्घटना घडली. कारच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पंजाबच्या भटिंडामध्ये ही दुर्घटना घडली. काँग्रसचे विधानसभेचे उमेदवार हरमिंदर जस्सी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान रॅली चालू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाने रॅलीतील कार्यकर्ते जखमी झाले. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
पंजाबमध्ये 117 विधानसभेच्या जागांसाठी 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सगळीकडेच सध्या प्रचाराची धूम चालू आहे. मात्र या रॅलीमध्ये ही दुर्घटना घडल्याने तिघांना प्राण गमवावे लागले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement