एक्स्प्लोर

गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही : खा. संजय काकडे

भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी त्यांच्याच पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे.

पुणे : गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर आहे. मात्र त्यापूर्वी भाजपच्या पराभवाची भविष्यवाणी त्यांच्याच पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही, काँग्रेस बहुमताच्या जवळ असेल, असं पुण्यातील भाजपचे सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. पुण्यात संजय काकडे एबीपी माझाशी बोलत होते. गुजरात निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येक घटकाला आपल्या टीमने मत विचारलं. या एकूण सर्वेक्षणाच्या आधारावर गुजरातमध्ये भाजपची सत्ता येणार नाही, असं चित्र असल्याचं संजय काकडे यांनी सांगितलं. ''भावनिक मुद्द्यांवर निवडणूक झाली'' गुजरातची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झालीच नसल्याचं संजय काकडेंनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी गुजरातसाठी काय काम केलं, ते गुजरातला काय देणार किंवा दिलं आहे, असे कोणतेही मुद्दे गुजरातच्या प्रचारात वापरण्यात आले नाही. केवळ भावनिक मुद्द्यांवर निवडणूक झाली, असा घरचा आहेर संजय काकडे यांनी पक्षाला दिलाय. स्वातंत्र्यापासून कोणताही पक्ष 25 वर्षांपेक्षा जास्त काळ सलग सत्तेत राहिलेला नाही. गुजरातमध्ये 22 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळीही सत्ता आल्यास पुढच्या निडणुकीपर्यंत 27 वर्ष पूर्ण झालेली असतील. याचं सर्व श्रेय मोदींना जाईल, मात्र आपल्या अंदाजानुसार भाजपची सत्ता येणार नाही, असं संजय काकडे म्हणाले. विविध न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार गुजरातमध्ये भाजपचा विजय होताना दिसत आहे. तर दुसरीकडे पक्षातीलच खासदाराने पराभवाची भविष्यवाणी केली आहे. या सर्व अंदाजांचा निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. दोन टप्प्यात 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभेसाठी मतदान झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget