एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्र में कुछ खोकर बिल्कुल नहीं होगा अलायन्स : अमित शाह
अमित शाह यांच्या अध्यक्षेखाली महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बुधवारी (2 जानेवारी) महाराष्ट्र सदनात बैठक झाली.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या युती संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "महाराष्ट्र में अगर अलायन्स बनाना हैं तो कुछ खोकर क्यू बनाएंगे? कुछ खोकर बिल्कुल नहीं होगा अलायन्स," असं वतव्य अमित शाहांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत केलं.
अमित शाह यांच्या अध्यक्षेखाली महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बुधवारी (2 जानेवारी) महाराष्ट्र सदनात बैठक झाली. महाराष्ट्रात युती करायची असेल तर काही गमावून का करायची? काही गमावून युती अजिबात होणार नाही, असं शाह म्हणाले. "भाजप बिहारसारखी भूमिका महाराष्ट्रात घेणार नाही.
अमित शाहांसोबत दिल्लीत महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक
जी दया नितीश कुमार यांना दाखवली ती शिवसेनेला दाखवणार नाही. युतीसाठी शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट पाहणार, पण झुकणार नाही," असं शाह म्हणाले. तसंच महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सर्व 48 जागांवर लढण्याची भाजपची तयारी आहे. परंतु शिवसेनेसाठी शेवटपर्यंत वाट पाहायला तयार असल्याचा उच्चर शाह यांनी केला.
या बैठकीत शाहांनी खासदारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसंच प्रत्येकाने आपापल्या मतदरासंघात जाऊन मतदारांना जास्तीत जास्त वेळ देण्यासही शाहांनी सांगितलं. या बैठकीला नारायण राणेही उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement