एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भाजप खासदार वरुण गांधी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात तीन तास चर्चा!

संजय राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्या 'डिनर डिप्लोमसी'मुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे

नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी (29 मार्च) रात्री ही बैठक झाली. सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय राऊत यांनी वरुण गांधी यांना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान संजय राऊत आणि वरुण गांधी यांच्या 'डिनर डिप्लोमसी'मुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. चर्चेचा तपशील मात्र अद्याप समजू शकलेला नाही.

25 वर्षे युतीमध्ये एकत्र राहिलेले शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रातील 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे झाले. मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये कटुता आली. आता दोनही पक्षातील नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडल्याशिवाय राहत नाहीत. मात्र याच दरम्यान राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची राजकीय घडामोड घडली. भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली.

वरुण गांधी भाजपवर नाराज? 
दुसरीकडे वरुण गांधी यांनी काही काळापासून स्वत:ला भाजपपासून अलिप्त ठेवल्याचं पाहायला मिळतं. भाजपवर ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशातील पिलीभीतचे खासदार आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचं नाव काढलं. त्यातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून वरुण गांधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपलाच घेरताना दिसत आहेत. इतकंच नाही तर पक्षातील नेत्यांवर तोंडसुख घेतानाही ते दिसतात. त्यामुळे लवकरच वरुण गांधी भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचं म्हटलं जात. 

राजकीय परिस्थिती बदलली, वरुण गांधी पक्षापासून अलिप्त झाले
वरुण गांधी सध्या सोशल मीडियावरील आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. गांधी कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या वरुण गांधी यांचं भाजपमध्ये जोरदार स्वागत झालं. भाजप नेतृत्त्वाने त्यांना 2013 मध्ये सर्वात कमी वयाचे सरचिटणीस देखील बनवलं. त्यांची लोकप्रियता पाहता भाजपने त्यांची पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणून नेमणूक केली. पण जसजसं राजकीय परिस्थिती बदलत गेली तसतसे वरुण गांधी यांचं पद, सन्मान आणि महत्त्व कमी होऊ लागलं. एकेकाळी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे वरुण गांधी आज पक्षापासून पूर्णत: अलिप्त आहेत. अनेक वेळा त्यांनी स्वपक्षीयांवर तोंडसुख घेतलं, विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करुन पक्षाला अडचणीत आणलं. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये घोषित आपल्या नव्या टीममधून वरुण गांधी आणि मनेका गांधी यांना बाहेर ठेवून कठोर संदेश दिला होता की, पक्ष वरुण गांधी यांची ही वृत्ती सहन करणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 PmABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 29 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सBaba Adhav Pune Protest : विधानसभा निवडणुकीत पैशांचा मोठ्याप्रमाणात वापर, आढाव यांचा आरोप; पुण्यात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Embed widget