'शुद्राला शुद्र बोललं तर वाईट वाटतं', भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य
भाजप खासदार प्रज्ञा सिंह पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या सीहोरमध्ये एका क्षत्रिय संमेलनात बोलताना त्यांनी वर्ण व्यवस्थेवरुन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
सीहोर : भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या सीहोरमध्ये एका क्षत्रिय संमेलनात बोलताना त्यांनी वर्ण व्यवस्थेवरुन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
प्रज्ञा ठाकूर यांनी धर्मशास्त्राचा हवाला देत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, "जेव्हा आपण एखाद्या क्षत्रियाला क्षत्रिय म्हणतो, त्यावेळी त्याला वाईट वाटत नाही. जर आपण एखाद्या ब्राम्हण व्यक्तीला ब्राम्हण म्हटलं तर त्याला वाईट वाटत नाही. जर वैश्य समाजातील लोकांना वैश्य म्हटलं तर त्यांना वाईट वाटत नाही. परंतु, जर आपण एखाद्या शुद्राला शुद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. कारण काय आहे? कारण त्यांना गोष्टी कळत नाहीत."
ये कैसे बयान हैं? क्षत्रिय को क्षत्रिय कह दो बुरा नहीं लगता, शूद्र को शूद्र कह दो बुरा लगता है? क्या ये. जातिवाद नहीं @narendramodi @jpdhanopiaINC @OfficeOfKNath @ndtvindia @ndtv @vinodkapri @anandrai177 @TCGEHLOT ये है जातिगत अवधारणा की समझ? @AunindyoC @manishndtv pic.twitter.com/Vt8I950Pmg
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) December 12, 2020
ममता बॅनर्जींवरही केली टीका
प्रज्ञा ठाकूर यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, "त्यांना वेड लागलं आहे. ठाकूर म्हणाल्या की, "त्या (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) वेड्या झाल्या आहेत. त्यांची तळमळ होतेय. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की, जिथे त्या राज्य करत आहेत, तो भारत आहे. पाकिस्तान नाही."
प्रज्ञा ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या की, "त्या (ममता बॅनर्जी) हताश झाल्या आहेत. कारण त्यांना वाटत आहे की, त्यांचं सरकार बरखास्त होणार आहे. ठाकूर यांनी दावा केला आहे की, पुढील विधानसभा निवडणूकांनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचं शासन येईल आणि तिथे हिंदू राज सुरु होईल."
PM मोदी यांनी प्रज्ञा ठाकूर यांना सुनावलं
प्रज्ञा ठाकूर यांच्यासाठी नवनवे वाद निर्माण करणं ही काही नवी गोष्ट नाही. याआधीही त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आपल्या भडकाऊ भाषणांसाठी त्या नेहमीच ओळखल्या जातात. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन सुनावलं होतं. परंतु, तरिदेखील प्रज्ञा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवलं नाही.
त्यांनी महात्मा गांधी यांचे हत्यारे नथुराम गोडसे यांचा उल्लेख देशभक्त म्हणून केला होता. यावरुन विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रज्ञा ठाकूर यांनी सुनावलं होतं. मोदी म्हणाले होते की, जरी प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी, ते वैयक्तिकरित्या त्यांना कधीच माफ करणार नाहीत.