एक्स्प्लोर
Advertisement
'पालकांच्या संमतीविना तरुणींना लग्नाचं किमान वय 18 ऐवजी 21 करा'
अलिकडे तरुणींनी पालकांच्या संमतीविना, म्हणजेच पळून जाऊन लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तरुणींसाठी लग्न करण्याच्या पात्रतेचं वय 18 वर्षांवरुन 21 वर्ष करावं, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी केली.
नवी दिल्ली : पालकांच्या संमतीविना लग्न करण्याचं किमान वय तरुणींसाठी 18 वरुन 21 वर्षांवर न्यावं, अशी मागणी मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली. शेट्टी यासंदर्भात लोकसभेत खाजगी सदस्य विधेयक सादर करणार आहेत.
अलिकडे तरुणींनी पालकांच्या संमतीविना, म्हणजेच पळून जाऊन लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तरुणींसाठी लग्न करण्याच्या पात्रतेचं वय 18 वर्षांवरुन 21 वर्ष करावं, अशी मागणी गोपाळ शेट्टी यांनी केली. पालकांची संमती असेल तर 18 व्या वर्षी लग्न व्हावं, पण पालकांची संमती नसेल तर मुलींना 21 व्या वर्षापर्यंत लग्न करता येऊ नये, यासाठी ही मागणी केल्याचं गोपाळ शेट्टी म्हणाले.
'शाळा-कॉलेजमध्ये तरुणी 16-17 व्या वर्षी प्रेमात पडतात. नकळत्या वयात त्या लग्नाचा निर्णय घेतात. पालकांची परवानगी नसेल, तर या मुली अठराव्या वर्षी रजिस्टर पद्धतीने लग्न करतात. मात्र अशावेळी पालकांवर डोंगर कोसळतो. कायदाही तरुणींच्या बाजूने असल्यामुळे पालक काहीच करु शकत नाहीत', असं गोपाळ शेट्टी सांगतात.
अठराव्या वर्षी आंधळ्या प्रेमातून लग्न केलं, मात्र काही वर्षांतच लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हे विधेयक आणणार असल्याचं शेट्टींनी स्पष्ट केलं.
जर पालकांच्या इच्छेविरुद्ध तरुणींना लग्न करायचं असेल, तर त्यांना किमान वयाची अट 21 वर्ष करावी. त्यामुळे लग्नाच्या निर्णयाबाबत विचार करण्यासाठी त्यांना तीन वर्षांचा अतिरिक्त वेळ मिळेल. तरुणी तोपर्यंत मॅच्युअर होतील आणि लग्नाबाबत सक्षमपणे निर्णय घेऊ शकतील, असा विश्वास शेट्टींना वाटतो.
मतदान 18 व्या वर्षी चालतं, मग त्या वयात लग्नाची परवानगी का नाही, असा प्रश्न गोपाळ शेट्टींना विचारण्यात आला. 'मत चुकलं तरी पुन्हा पाच वर्षांनी योग्य उमेदवाराला मतदान करण्याची संधी तुम्हाला मिळते. मात्र लग्नासारखा आयुष्यभराचा निर्णय चुकला, तर पश्चाताप करावा लागतो. त्यातून बाहेर पडता येतं, मात्र झालेलं नुकसान भरुन काढता येत नाही' असंही शेट्टी म्हणाले.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
Advertisement