एक्स्प्लोर
VIDEO : पाया पडायला आलेल्या खासदाराच्या पाठीवर मोदींचा धपाटा
मोदींना दोहरेंच्या पाठीवर मारलेला धपाटा इतका जोराचा होता की, शेजारी उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींना स्पष्ट ऐकू आला. त्यामुळे अर्थात एकाचवेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आणि हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला.
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या पाया पडण्यासाठी भाजप खासदार गेला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाठीवर धपाटा मारला आणि पाया न पडण्यास सांगितले. संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला.
नेमकं काय झालं?
संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील इटावाचे भाजप खासदार अशोक कुमार दोहरे हे मोदींच्या पाया पडण्यासाठी वाकले.
त्यावेळी पंतप्रधान मोदींनी खासदार अशोक कुमार दोहरे यांना थांबवलं आणि पाय धरु नका, असं बजावलं. शिवाय, पाया पडण्यासाठी वाकलेल्या खासदार दोहरे यांच्या पाठीवर पंतप्रधान मोदींना जोराचा धपाटाही मारला.
मोदींना दोहरेंच्या पाठीवर मारलेला धपाटा इतका जोराचा होता की, शेजारी उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींना स्पष्ट ऐकू आला. त्यामुळे अर्थात एकाचवेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आणि हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला.
कोण आहेत अशोक कुमार दोहरे?
अशोक कुमार दोहरे हे उत्तर प्रदेशातील इटावा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. अशोक कुमार दोहरे यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवलं आहे.
विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशातील एससी-एसटी अॅक्टसंदर्भातील निदर्शनादरम्यान भाजप खासदार अशोक कुमार दोहरे यांनीच सरकारवर टीका केली होती. उत्तर प्रदेश सरकार खोट्या गुन्ह्यांमध्ये दलितांनी अडकवत असल्याचा आरोप करत खासदार दोहरे यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यामुळे आधी आपल्याच सरकारविरोधात दंड थोपटणारे खासदार दोहरे थेट पंतप्रधान मोदींच्या पाया पडण्यासाठी वाकल्याचे दिसून आले.
संसदीय बैठकीतही एकजुटीचे चित्र
दरम्यान, भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतही काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. एरवी संसदीय पक्षाची बैठक असल्यावर व्यासपीठावर केवळ पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह असत, मात्र आज सात ते आठ खुर्च्या व्यासपीठावर होत्या. यावर अडवाणींसह भाजपमधील महत्त्वाच्या नेत्यांनाही स्थान होतं.
तसेच, टीडीपीने आणलेला अविश्वास ठराव मोदी सरकारने जिंकल्याचा आनंदही यावेळी व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान मोदींना पेढे भरवून यावेळी आनंद साजरा केला गेला. एकंदरीत भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाअंतर्गत एकजूट दिसून आली.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement