एक्स्प्लोर

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपचा 'मेगाप्लान'; बंगाल, बिहारनंतर आता महाराष्ट्राचा नंबर?

Bharat Jodo Nyay Yatra: नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परतल्याच्या एका दिवसानंतर, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये दाखल होणार आहे.

Bharat Jodo Nyay Yatra: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सध्या 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) सुरू आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि इंडिया आघाडीतील (India Alliance) मतभेद चव्हाट्यावर आले. नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडीशी काडीमोड घेत वेगळा संसारही थाटला. नितीश कुमार भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) परतल्याच्या एका दिवसानंतर, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' बिहारमध्ये दाखल होणार आहे. विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे नितीश कुमार, ज्यांच्यामुळे इंडिया आघाडीची स्थापना झाली, त्यांनीच असा वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 

ममता बॅनर्जी, नितेश कुमारांमुळे भारत जोडो यात्रेला धक्का 

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर 'भारत जोडो न्याय यात्रा 2.0'साठी कांग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्ष उत्साहित होते. काँग्रेसकडून यात्रा सुरू होणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच या यात्रेबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा होत्या. आगामी लोकसभा निवडणुकींवर या यात्रेचा मोठा परिणाम होऊ शकतो. पण, आधी ममता आणि आता नितीश कुमारांचं इंडिया आघाडीतून बाहेर पडणं यामुळे राहुल गांधींच्या यात्रेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी आणि नितेश राणे यांचा आघाडीतून बाहेर पडण्याचा टायमिंग भाजपनं ठरवलाय, यामागील मूळ हेतू राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं महत्त्व कमी करणं हाच होता. 

नितीश कुमारांचा इंडिया आघाडीशी काडीमोड

इंडिया आघाडीतून बाहेर पडून नितीश कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी आघाडीच्या संभाव्यतेला मोठा धक्का दिला आहे. नितीश कुमार विरोधी आघाडीच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते, ज्यांची पहिली बैठक त्यांनी गेल्या जूनमध्ये पाटण्यात बोलावली होती. गेल्या काही आठवड्यांमध्ये राजदसोबत तणाव आणि वाढत्या मतभेदाच्या बातम्यांदरम्यान, जेडीयू भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतली आहे. यामुळे आता बिहारमधील जागावाटपावर परिणाम होणार आहे. बिहारमध्ये आता आरजेडी आणि काँग्रेस एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. नितीश कुमार यांचं जाणं इंडिया आघाडीसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. कारण आता निवडणुकीत विरोधकांना प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

जसं बंगाल आणि बिहारमध्ये भारत जोडो यात्रा पोहोचताच ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांना झटका दिला, तसाच प्रकार महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा पोहचल्यावर मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप असल्याच बोललं जात आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील मोठे नेते हे भाजपसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. आता यात कितपत तथ्य असेल, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यावर बिहार आणि पश्चिम बंगालप्रमाणेच महाराष्ट्रातील राजकारणातही खळबळ माजणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल, हे मात्र नक्की. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : 'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात
'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात
Nandgaon Assembly Constituency : समीर भुजबळांची माघार नाहीच, सुहास कांदेंना तगडं आव्हान, नांदगावमध्ये डमी उमेदवारही रिंगणात
समीर भुजबळांची माघार नाहीच, सुहास कांदेंना तगडं आव्हान, नांदगावमध्ये डमी उमेदवारही रिंगणात
धक्कादायक! उमेदवाराकडूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न; समोर आलं कारण
धक्कादायक! उमेदवाराकडूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न; समोर आलं कारण
Maharashtra Assembly Elections 2024 : स्पेशल विमान पाठवूनही माघार नाहीच, विखे पाटलांची डोकेदुखी वाढली; शिर्डीत फडणवीसांची शिष्टाई निष्फळ
स्पेशल विमान पाठवूनही माघार नाहीच, विखे पाटलांची डोकेदुखी वाढली; शिर्डीत फडणवीसांची शिष्टाई निष्फळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Patil on Shinde: बाप-बेट्यांची दानत माहितीय,बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार?Satej Patil kolhapur : झक मारायला... मला तोंडघशी पाडलं सतेज पाटलांच्या संतापाचा कडेलोटSada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : 'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात
'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात
Nandgaon Assembly Constituency : समीर भुजबळांची माघार नाहीच, सुहास कांदेंना तगडं आव्हान, नांदगावमध्ये डमी उमेदवारही रिंगणात
समीर भुजबळांची माघार नाहीच, सुहास कांदेंना तगडं आव्हान, नांदगावमध्ये डमी उमेदवारही रिंगणात
धक्कादायक! उमेदवाराकडूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न; समोर आलं कारण
धक्कादायक! उमेदवाराकडूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न; समोर आलं कारण
Maharashtra Assembly Elections 2024 : स्पेशल विमान पाठवूनही माघार नाहीच, विखे पाटलांची डोकेदुखी वाढली; शिर्डीत फडणवीसांची शिष्टाई निष्फळ
स्पेशल विमान पाठवूनही माघार नाहीच, विखे पाटलांची डोकेदुखी वाढली; शिर्डीत फडणवीसांची शिष्टाई निष्फळ
Maharashtra Assembly Elections 2024 : केज विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा
केज विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा
फडणवीसांचा नाना काटेंना फोन, मावळ पॅटर्नवर चर्चा; बाळा भेगडे म्हणाले, भाजप आमच्यासोबत
फडणवीसांचा नाना काटेंना फोन, मावळ पॅटर्नवर चर्चा; बाळा भेगडे म्हणाले, भाजप आमच्यासोबत
Maharashtra Politics : शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या उमेदवारांविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी माघार घ्यायला लावली
शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या उमेदवारांविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी माघार घ्यायला लावली
सोलापुरात दिलीप मानेंची माघार, पण धर्मराज काडादी लढणार; सुभाष देशमुखांविरुद्ध सांगली पॅटर्न?
सोलापुरात दिलीप मानेंची माघार, पण धर्मराज काडादी लढणार; सुभाष देशमुखांविरुद्ध सांगली पॅटर्न?
Embed widget