एक्स्प्लोर
Advertisement
'गोली मारो'....सारखी वक्तव्यं आम्हाला भोवली : अमित शाह
भाजप हा असा पक्ष आहे जो विजय आणि पराभव यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्हाला विचारधारेचा विस्तार करायचा हेही त्यामागचं कारण आहे. गोली मारो, भारत-पाकिस्तान मॅच अशी काही वक्तव्यं भाजपा नेत्यांनी केली जी करायला नको होती असं अमित शाह यांनी म्हटलं आहे
नवी दिल्ली : दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात आमच्या नेत्यांनी केलेली काही द्वेष पसरवणारी वक्तव्य आम्हाला भोवली, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. गोली मारो, इंडो-पाक मॅच यासारख्या वक्तव्यांनी आमचा घात केला, असंही शाह म्हणाले. यासंदर्भात ट्विट करुन अमित शाहांनी आपली भूमिका मांडली आहे.
भाजप हा असा पक्ष आहे जो विजय आणि पराभव यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्हाला विचारधारेचा विस्तार करायचा हेही त्यामागचं कारण आहे. गोली मारो, भारत-पाकिस्तान मॅच अशी काही वक्तव्यं भाजपा नेत्यांनी केली जी करायला नको होती असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसंच आगामी काळात अशा वक्तव्यांपासून नेत्यांनी दूर राहिलं पाहिजे असंही त्यांनी सुचवलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्ही स्वीकारला आहे. जनतेने जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
शांतीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार- शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वांना शांतीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ज्यांना सीएएच्या मुद्यावर माझ्याशी चर्चा करायची आहे ते माझ्या कार्यालयात येऊन वेळ घेऊ शकतात. त्यांना तीन दिवसांच्या आत त्यांच्याठी उपलब्ध असेल
दिल्लीमध्ये मतदान टक्का वाढला- अमित शाह
अमित शाह म्हणाले की, काही राज्यात आम्हाला निवडणुकीत यश मिळाले नाही. याचा अर्थ असा नाही की, भाजपवरून लोकांचा विश्नास उडाला आहे. महाराष्ट्रात देखील आम्ही जिंकलो. हरियाणामध्ये आमच्या फक्त सहा जागा कमी झाल्या. झारखंडमध्ये निवडणूक हरलो तर दिल्लीमध्ये जागा आणि मतदानाचा टक्का वाढला आहे.
दिल्लीमध्ये निवडणुकांच्या दरम्यान भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. या संदर्भात निवडणूक आयोगाने देखील कारवाई केली. निवडणुक निकालापूर्वीच भाजप दिल्लीमध्ये सरकार येण्याचा दावा करत होती. परंतु 11 फेब्रुवारीला निकाल विरुद्ध आले. भाजपला दहा आकड्यापर्यंत पोहचता आले नाही. भाजपला आठ जागांवर समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. भाजपला एकूण 38.51 टक्के मत मिळाले.
Amit Thackeray Exclusive | मनसेचा हा मोर्चा अभूतपूर्व : अमित ठाकरे
संबंधीत बातम्या :
Delhi Election Result 2020 | दिल्लीत 'आप'ला एकाहाती कौल, 62 जागांवर आघाडी
Delhi Election Result 2020 | 'दिल्ली' विजयानंतर आपची पहिली बैठक, विधिमंडळ नेत्याची होणार निवड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement