(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP Foundation Day: भाजपचा 44वा स्थापना दिवस; देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
BJP Sthappna Diwas: आज भाजपचा 44वा स्थापना दिवस. भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
BJP Foundation Day: भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) आज 44वा स्थापना दिवस. 1980 मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची (BJP) सुरुवात झाली होती. भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झालं. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे.
सध्या 12 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या 303 जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातोय.
मोदी करणार कार्यकर्त्यांना संबोधित
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज स्थापना दिवसाच्या निमित्तानं दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करणार आहेत. तर आज सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यासंदर्भात मोदींनी एक ट्वीटही केलं आहे.
Tomorrow, 6th April is an important day for @BJP4India as it is the Sthapana Diwas of the Party. At around 10 AM, will be addressing Party Karyakartas.
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "6 एप्रिल हा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा आहे, कारण हा पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्तानं सकाळी 10 वाजता पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे."
भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ (Tarun Chugh) म्हणाले की, "आपल्या स्थापना दिनानिमित्त पक्षानं 6 एप्रिल 2023 ते 14 एप्रिल या कालावधीत डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सप्ताह पाळण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील."
स्थापना दिनानिमित्त भाजपची जय्यत तयारी, अनेक कार्यक्रमांचं आयोजन
स्थापन दिवस साजरा करण्यासाठी भाजपकडून मोठी योजना आखण्यात आली आहे. तसेच, विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून संपूर्ण देशात भिंत लेखनाचं कामही केलं जाणार आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा स्वतः दिल्लीतील एका बूथवर जाऊन भित्तीलेखनाचे काम करणार आहेत. तसेच गेल्या वर्षाप्रमाणेच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा सकाळी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण करतील. यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
'भाजप'ची स्थापना नेमकी कशी झाली?
1980 मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झालं. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं.
अटल-अडवाणी जोडीनं भाजपला 16 वर्षांनी देशात सत्तेवर आणलं. 1996 मध्ये पहिल्यांदा केंद्रात 13 दिवस अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झालं. मात्र, बहुमताअभावी त्यांना राजीनामा द्यावा लागला.
सध्या 12 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या 303 जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पक्षाची अनेक राज्यांमध्ये हायटेक कार्यालयंही आहेत. 33 वर्ष जुन्या या पक्षाचे अनेक किस्से राजकीय विश्वात आहेत.