एक्स्प्लोर
Advertisement
बर्थडे स्पेशल: मनमोहन सिंह यांचे 5 निर्णय देश विसरु शकणार नाही!
आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मनमोहन सिंह हे आपल्या मौनामुळे चर्चेत राहिले. मात्र अबोल राहून बोलकं काम करणं हीच त्यांची खासियत होती.
नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा आज 86 वा वाढदिवस. मनमोहन सिंह हे आज 87 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मनमोहन सिंह यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, मनमोहन सिंह यांना दीर्घायुष्य लाभो अशी कामना केली. तर राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन मनमोहन सिंह यांना शुभेच्छा दिल्या.
"मनमोहन सिंहजींचा वाढदिवस म्हणजे त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि देशासाठी वाहून घेऊन केलेल्या कामाचं कौतुक करण्याची आमच्यासाठी एक संधी आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि आनंद मिळो अशा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. मनमोहन सिंह हे 2004 ते 2014 या दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते. आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मनमोहन सिंह हे आपल्या मौनामुळे चर्चेत राहिले. मात्र अबोल राहून बोलकं काम करणं हीच त्यांची खासियत होती. अचाट बुद्धीमत्तेमुळे भारताच्या ढेपाळलेल्या अर्थव्यवस्थेला कमी कालावधीत ट्रॅकवर आणणारा माणूस म्हणजे मनमोहन सिंह होय. छोट्याशा गावात जन्म मनमोहन सिंह यांचा जन्म पंजाब प्रांतातील गाह या गावात झाला. सध्या हा भाग पाकिस्तानात आहे. मनमोहन सिंह यांचं शिक्षणManmohan Singh Ji’s birthday is an opportunity for us to appreciate and remember his many years of selfless service and dedication to the cause of nation building. I wish him a very Happy Birthday and good health and happiness always.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 26, 2018
- लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असलेल्या मनमोहन सिंह यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक पदव्या आपल्या नावावर केल्या.
- पंजाब विद्यापीठातून बीएची पदवी
- 1954 मध्ये अर्थशास्त्रात एमएम
- पीएचडीसाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश, तिथे राइट्स पुरस्काराने सन्मान
- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या नेफिल्ड कॉलेजमधून डी.फिल परीक्षा उत्तीर्ण
- चंदीगड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती
- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही शिक्षक म्हणून काम पाहिलं
- जगातील कुशल अर्थशास्त्र म्हणून ओळख
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement