सिंधू नदीतून रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंचं कुटुंबच पाकिस्तान सोडून कॅनडाला पळालं, नेमकं काय घडलं?
Bilawal Bhutto Family Left Pakistan: भारत कधीही हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानात भीती आहे .अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना परदेशात पाठवून दिले आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरलंय . (Jammu & Kashmir) या हल्ल्यानंतर भारताने कारवाई करत सिंधू नदी करार रद्द केला आणि पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावले उचलायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे . पाकिस्तानी नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत .लोक देश सोडून पळून जाऊ लागले आहेत .सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानचे पाणी थांबवले तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणारे पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांचे कुटुंब आता पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेले आहे . धमकीच्या एक दिवसानंतर रविवारी सकाळी (27 एप्रिल ) त्यांच्या कुटुंबातील सदस्य बख्तावर भुट्टो आणि आसिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला गेल्याची बातमी समोर येत आहे . (Pakistan)
सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानच्या पीपीपी पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी 'मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहील किंवा त्यांचे रक्त त्यात वाहील.' असं खुलं चिथावणीखोर धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तान सोडले आहे. (Bilawal Bhutto Family Left Pakistan)
भारताच्या कारवायांवर पाकिस्तानमध्ये घबराट
पाकिस्तानात सध्या भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती आहे .अशा परिस्थितीत त्यांच्या सैन्याचे मनोबलही घसरले आहे .अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना परदेशात पाठवून दिले आहे .यात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचाही समावेश आहे .या लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांना खाजगी जेटने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याचे वृत्तसमोर येत आहे . पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच भारताने अरबी समुद्रातील आयएनएस सुरत येथून क्षेपणास्त्राची चाचणी करून पाकिस्तानला कठोर संदेश दिला .त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांविरोधात आणि त्यांच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल .जगात कुठेही लपले असतील तर त्यांना शोधून काढले जाईल असा इशाराही दिला होता .
देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाचे वातावरण आहे . भारतातील नागरिक पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तान विरोधात बदला घेण्याची मागणी करत आहेत .देशातील सर्व राजकीय पक्ष ही या मुद्द्यावर सरकारच्या पाठीशी उभे आहे .अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून पाकिस्तान विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे .सध्या भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाकिस्तानी लोकांचे व्हिसा रद्द केले आहेत .त्यांना देशातून परत जाण्यास सांगितले आहे तसेच इतर राजनैतिक संबंध रोखण्यात येत आहेत .
हेही वाचा:
India Vs Pakistan | सिंधू नदीत पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त, Bilawal Bhutto यांची भारताला धमकी























