एक्स्प्लोर

Bijapur Naxal News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवादी चकमक सुरू, सहा नक्षलवाद्यांचा खात्मा; टॉप कमांडर लिंगा, पापारावला जंगलात घेरलं

Chhattisgarh Naxal News : बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे टॉप कमांडर असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. 

गडचिरोली : छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून त्यामध्ये आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर लिंगा आणि पापारावला या जंगलात घेरल्याची माहिती आहे. 

बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. गुरुवारी रात्री उशिरा जवानांच्या संयुक्त पथकाला नक्षल विरोधी अभियानासाठी या परिसरात रवाना करण्यात आलं होतं. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून ही चकमक सुरू आहे. 

नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव उपस्थित असल्याची माहिती

पीडिया जंगलात असलेल्या अनेक बड्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती आहे. दोन्हीकडून अजूनही अधूनमधून चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांतील जवान हे नक्षलविरोधी अभियानात असून सकाळपासून चकमक सुरू आहे. एक बडा नक्षलवादी नेता या जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई सुरू केली. 

गांगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया भागातील जंगलात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या समितीमध्ये डीकेएसझेडसी, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरमधील बडे नक्षलवादीही आहेत.
 
माहितीनंतर शेजारच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांतील एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या 1200 जवानांनी संयुक्त कारवाई केली. जिथे शुक्रवारी सकाळी जंगलात झालेल्या भीषण चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले.

या आधीच्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले

या आधी 30 एप्रिल रोजी बस्तर पोलिसांना नारायणपूर चकमकीत मोठे यश मिळाले होते. नक्षलवादी आणि जवानांमध्ये सुमारे 9 तास चाललेल्या चकमकीत जवानांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये 3 महिला आणि 7 पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे. 29 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सैनिक नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात शोधासाठी निघाले होते. रात्रभर शोध घेतल्यानंतर 30 एप्रिलला सकाळी डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांचा अबुझमाडमधील ताकामेटाच्या जंगलात नक्षलवाद्यांशी सामना झाला. त्यामध्ये 10 नक्षलवादी मारले गेले तर  घटनास्थळावरून एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar on AAP : दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
Amit Thackeray : आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
Tirupati Balaji Laddu Controversy : तिरुपती लाडू वाद, आधी जनावरांच्या चरबीमुळे प्रकरण तापलं, आता CBI च्या तपासात नवी माहिती समोर!
तिरुपती लाडू वाद, आधी जनावरांच्या चरबीमुळे प्रकरण तापलं, आता CBI च्या तपासात नवी माहिती समोर!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की  500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?
पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिला शेतकरी अपात्र ठरणार की त्यांना 1500 रुपये मिळणार? GR काय सांगतो?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devgad Hapus In Sangli : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखलRaju Shetti On Supreme Court : न्यायाधीशांनी 3 टप्प्यांत पगार घ्यावा,FRPच्या मुद्यावरुन आक्रमकABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 10 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 10 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar on AAP : दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
दिल्लीत आम आदमी पक्षाचा धुरळा, केजरीवालही पराभूत; प्रकाश आंबेडकरांनी एक इमोजीसह फक्त 10 शब्दात दोन कारणे सांगितली!
Amit Thackeray : आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
आता भाजपला घराणेशाही दिसत नाही का? अमित ठाकरे आमदार होण्याचे संकेत मिळताच काँग्रेसचा सवाल
Tirupati Balaji Laddu Controversy : तिरुपती लाडू वाद, आधी जनावरांच्या चरबीमुळे प्रकरण तापलं, आता CBI च्या तपासात नवी माहिती समोर!
तिरुपती लाडू वाद, आधी जनावरांच्या चरबीमुळे प्रकरण तापलं, आता CBI च्या तपासात नवी माहिती समोर!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की  500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?
पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिला शेतकरी अपात्र ठरणार की त्यांना 1500 रुपये मिळणार? GR काय सांगतो?
"आई-वडिलांना शारीरिक संबंधावेळी बघणार का...", रणवीर अलाहाबादियाच्या फालतू प्रश्नावर नेटकरी भडकले
Mahayuti clash: महायुतीत पुन्हा धुसफूस, शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईल्स CMO मध्ये अडकल्या, आदेश न निघाल्याने तीव्र नाराजी
आधी एकनाथ शिंदेंना समितीतून वगळलं, आता शिंदेंच्या मंत्र्यांच्या फाईल्स CMO मध्ये अडकल्या, महायुतीत धुसफूस
Nashik Crime : अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला, नाशिकमध्ये खळबळ
अनंत कान्हेरे मैदानावर भरदिवसा 19 वर्षीय मुलीवर प्राणघातक हल्ला, नाशिकमध्ये खळबळ
'तुझी बायको खूप सुंदर आहे, लाईट बील कमी करायचं असल्यास माझ्याकडे एकटीला पाठवून दे, कमी करून देतो' शेतकऱ्याला वीज अभियंत्याची 'ऑफर'
'तुझी बायको खूप सुंदर आहे, लाईट बील कमी करायचं असल्यास माझ्याकडे एकटीला पाठवून दे, कमी करून देतो' शेतकऱ्याला वीज अभियंत्याची 'ऑफर'
Embed widget