एक्स्प्लोर
लेकीच्या संसारात आईची एन्ट्री, सासू-जावयासोबत विवाहबद्ध

पाटणा : बिहारमधली एक महिला चक्क आपल्या जावयाच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे. त्यानंतर तिने लेक आणि एक वर्षाच्या नातवाला जावयापासून विलग करुन संसार थाटला आहे. बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात ही आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने यासंदर्भात प्रश्न विचारला आहे. 19 वर्षीय ललिता आणि 22 वर्षीय सुरज यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती. जावईबापूंच्या आजाराचं निमित्त झालं आणि 42 वर्षांच्या सासूबाई आशा देवी त्यांच्या घरी राहायला गेल्या. मात्र पतीचं आजारपण काढण्यासाठी आईला बोलावणं मुलीला चांगलंच महागात पडलं. आशा देवी आपल्या मुलाच्या वयाच्या सुरजच्या प्रेमात पडल्या. आशा देवी त्यांच्या पुरैनी इथल्या घरी परतल्यानंतरही हे प्रेमप्रकरण सुरुच राहिलं. जावई आणि सासूबाई तासनतास फोनवर बोलत बसायचे. आशा देवी यांचे पती दिल्लीत एका फॅक्टरीमध्ये कामाला असल्यामुळे दोघांना भेटीगाठीसाठी पूर्ण वेळ मिळत होता. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि गेल्या महिन्यात ते पुर्णियामध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. विशेष म्हणजे हे नवदाम्पत्य एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालं असून दोघांना विलग करण्याचा आम्हाला अधिकार नाही, असं त्यांच्या जातपंचायतीने स्पष्ट केलं. आशा देवी यांच्या पूर्वीच्या पतीने लेकीला माहेरी बोलावून घेतलं आहे. मात्र सुरज आणि ललिता यांचा अधिकृत घटस्फोट घेतला का याची माहिती नाही.
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















