CM Nitish Kumar Resigns : नितीश कुमारांनी राज्यापालांकडे दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा , नव्या सरकारचा आजच होणार शपथविधी
Bihar CM Nitish Kumar Resigns: : बिहारमध्ये आता सरकारची समिकरणं पुन्हा एकदा बदलणार आहेत. कारण नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.
मुंबई : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यापालांकडे सुपूर्द केला आहे. तसेच भाजप (BJP) आणि जेडीयूच्या सरकारचा आजच शपथविधी होणार आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. पण या महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्याकडून घेण्यात आला आहे. नितीश कुमार यांच्यसह भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
"Today, I have resigned as the Chief Minister and I have also told the Governor to dissolve the government in the state," says JD(U) president Nitish Kumar pic.twitter.com/uDgt6sbBO3
— ANI (@ANI) January 28, 2024
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्तापालटली असून राज्य सरकारची समिकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार यांच्यासह 9 मंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यामुळे आता बिहारमधील राजकीय घडामोडींना बराच वेग आलाय. याचसाठी बिहारचे प्रभारी विनोद तावडे देखील पोहचले होते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील बिहारमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आलीये.
महाघाडीत परिस्थिती योग्य नसल्याने राजीनामा - नितीश कुमार
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच काम राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत.
बिहारमधील पक्षीय बलाबल
बिहार विधानसभा 243 सदस्यांची आहे. म्हणजे विधानसभेचे 243 आमदार आहेत. विधानसभेच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालूंचा आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला. आरजेडीला 79 जागा मिळाल्या. दुसऱ्या स्थानावर 78 आमदारांसह भाजप आहे. तिसऱ्या स्थानावर सध्याच्या महायुतीतील जेडीयू अर्थात नितीश कुमारांच्या पक्षाचे 45 आमदार आहेत. या युतीत काँग्रेसही आहे, ज्यांच्याकडे 19 आमदार आहेत.
बिहारमधील संख्याबळ
आरजेडी - 79
भाजप - 78
जेडीयू - 45
काँग्रेस - 19
CPI(ML)L - 12
हम - 4
CPI -2
CPIM - 2
अपक्ष,इतर - 1
MIM - 1
-------------
एकूण - 243
नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना
नितीशकुमार यांनी एनडीएसोबत जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.