एक्स्प्लोर

Bihar : बारदाना विका नाहीतर पगार मिळणार नाही; बिहार सरकारचा शिक्षकांना अजब आदेश

बिहार सरकारने एक आदेश काढून राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या जवळपास 80 हजार शिक्षकांना मोकळी बारदाना विकायची कामं लावली आहेत. बारदानाची विक्री झाली नाही तर पगार न देण्याचा आदेश जारी केला आहे. 

पाटना : जुलै महिन्याच्या अखेरपासून दरदिवशी सकाळी मोहम्मद तमिझुद्दीन हे स्थानिक बाजारपेठेत गोणपाट किंवा आपण ज्याला बारदाना म्हणतो, ते विकत बसतात आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला बारदाना खरेदी करण्याची विनंती करतात. मोहम्मद तमिझुद्दीन हे बिहारमधील केवडा या गावातील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. बारदाना विका नाही तर तुमचा पगार मिळणार नाही असा अजब फतवा बिहार सरकारने काढला असून त्यामुळे बिहारच्या शिक्षकांवर मोकळी बारदाना विकावे लागण्याची नामुष्की ओढावली आहे. 

मोहम्मद तमिझुद्दीन हे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील काडवा ब्लॉकमधील सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आहेत. शिक्षकांनी बारदाना विकला तरच मिळणार पगार मिळणार असा बिहार सरकारचा आदेश आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून ते काडवामधील बाजार पेठेत जातात आणि आपल्याकडचे रिकामे बारदाना विकण्यासाठी जोरजोरात ओरडत असतात. एका बारदानाची किंमत 10 रुपये असून ते ग्राहकांनी घ्यावेत अशी ते प्रत्येकाला विनंती करतात. आपल्याकडील बारदाना विकली गेली नाहीत तर आपल्याला पगार मिळणार नाही असंही ते कळवळीनं सांगतात. 

पण ही रिकामी बारदाना काही विकली जात नाहीत. कारण एकतर ती उंदरांनी कुरतडलेली असतात किंवा जुनी झालेली किंवा उसवलेली असतात. त्यामुळे मोहम्मद तमिझुद्दीन यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत असते. 

बिहारमधील 80 हजार शिक्षकांना बारदाना विकायचं काम
बिहार सरकारने एक आदेश काढून राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व शिक्षकांना अशी मोकळी बारदाना विकायची कामं लावली आहेत. या शिक्षकांची संख्या जवळपास 80,000 इतकी आहे. या शिक्षकांनी त्यांना दिलेले बारदाना विकली नाहीत तर त्यांना पगार मिळणार नाही असा आदेशही बिहार सरकारने जारी केला आहे. 

सरकारी शाळांना मध्यान आहार योजनेसाठी ज्या बारदानातून तांदूळ वा अन्नधान्य पुरवण्यात येतात ती मोकळी झाल्यावर शिक्षकांनी विकावी असा आदेश बिहारच्या नितीश कुमार सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणजे डीपीओंना दिला आहे. मध्यान आहार योजनेचे सचिव सतिश चंद्र झा यांनी एका पत्राद्वारे हा आदेश जारी केला आहे. 

सरकारला बारदानातून 12.7 कोटी हवेत
सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत या मोकळ्या बारदानाची संख्या ही 1.27 कोटी असून प्रत्येकी दहा रुपये किंमतीने त्याचे 12.7 कोटी रुपये सरकारकडे जमा करावेत असं या आदेशात नमूद केलं आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व सरकारी शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश दिला आहे की मोकळी बारदाने विकली गेली नाहीत तर त्यांना शिक्षा केली जाईल आणि पगारही दिला जाणार नाही. 

त्यामुळे बिहारमधील अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षक आता शिक्षणाच्या कामाव्यतिरिक्त ही बारदाना विकण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे. 

महाराष्ट्रातही मागे अशाच प्रकारचा एक फतवा जारी करण्यात आला होता. शिक्षकांनी त्यांना खिचडी तांदूळासाठी पुरवण्यात आलेला रिकामा बारदाना शासनाकडे जमा करावा, नाही तर त्याचे पैसे शिक्षकांच्या पगारातून कपात करण्यात येतील. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget