एक्स्प्लोर
रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!

नवी दिल्ली: बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमात झाल्याचं अमित शाह म्हणाले. सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत. "कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्ही सर्वपक्षीयांशी संपर्क साधून कळवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही याबाबत सांगितल्याचं" अमित शाह म्हणाले. कोण आहेत रामनाथ कोविंद?
- रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
- कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण
- 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
- 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
- भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
- भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
- 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























