एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सहभागी होणार आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी नितीश कुमार यांची पाटणा येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं.
राजू शेट्टी आणि नितीश कुमार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तासभर चर्चा केली. बिहार सरकारचं शेतकरी धोरण आणि सात निश्चय योजनेचं राजू शेट्टी यांनी कौतुक केलं.
देशभरातील सर्व शेतकरी नेते 7 जुलैपासून देशव्यापी किसान यात्रा सुरु करत आहेत. मध्यप्रदेशातील मंदसौर येथून यात्रा सुरु होणार असून चंपारण येथे त्याचा समारोप होणार आहे. यात्रेचा समारोप नीतीश कुमार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्राने आश्वासन दिल्याप्रमाणे अंमलात आणल्या पाहिजेत पण त्याचबरोबर उत्पादन खर्चातला काही भाग केंद्र सरकारने उचलला पाहिजे, यावर दोघांचंही एकमत झालं.
कृषी क्षेत्र संकटात सापडल्याने देशातला शेतकरी संकटात आहे. उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही आणि तितका भाव मिळत नाही, ही खरी अडचण आहे. उत्पादन खर्चाचा काही भाग केंद्र सरकारने उचलला पाहिजे तरच या प्रश्नाची कोंडी फुटेल, असं असं नीतीश कुमार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement