Bridge Collapse : 12 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल उद्घाटनाआधीच कोसळला; पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ब्रीज कोसळतानाचा VIDEO VIRAL
Bridge Collapse Viral Video : 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Bihar Bridge Collapse : बांधकाम सुरु असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अररियामध्ये घडली आहे. कोसळलेला पूल बनवण्यासाठी 12 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती आहे. 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळला, त्यामुळे पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. बिहारच्या अररियामधील या पूल दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओही समोर आला आहे.
पूल कोसळून बिहारमध्ये मोठी दुर्घटना
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पूल कोसळल्यानंतर एसपी सिंगला कंपनीत गार्ड म्हणून काम करणारा एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांकडून शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पाहता-पाहता पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला पूल
बिहारच्या अररिया जिल्ह्यातील सिकटी प्रखंड येथे पूल दुर्घटना घडली आहे. कोट्यवधी खर्च करुन बकरा नदीच्या पडरिया घाटावरील निर्माणाधन पूल अचानक कोसळला. पूल एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून नदीत सामावून गेला. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. पूल दुर्घटनेनंतर पुलाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्यामुळे उद्घाटनापूर्वीच पूल कोसळल्याचं म्हटलं जात आहे.
पाहा घटनेचा धक्कादायक व्हिडीओ
Bihar Bridge Collapse : बिहार में अब 12 करोड़ का पुल उद्घाटन से पहले गिरा, देखते-देखते नदी में समाया पुल।
— Virus Baba I.N.D.I.A Wala (@Virus_Studioz) June 18, 2024
डबल इंजन सरकार के फायदे pic.twitter.com/GS8pvDSXgW
12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळला
वर्षानुवर्षे हा पूल कधी होईल याची लोक वाट पाहत होते. हा पूल सिखती आणि कुर्साकटा ब्लॉकला जोडतो. हा पूल बांधण्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार विजयकुमार मंडल आणि खासदार प्रदीपकुमार सिंह यांनी अथक प्रयत्न केले होते. यापूर्वी हा पूल बांधण्यात आला, तेव्हा पुरामुळे नदीचे पात्र वाहून गेले होते. यानंतर 12 कोटी रुपये खर्चून नदीपात्रापर्यंत पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. पण विभागातील लोकांनी लक्ष न दिल्याने ठेकेदाराने योग्य काम केलं नाही. त्यामुळे मंगळवारी हा पूल नदीत कोसळला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :