एक्स्प्लोर
सौंदर्याशिवाय प्रियांकाचं काहीच कर्तृत्व नाही, भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान
काँग्रेसनं प्रियांका गांधींना सक्रीय राजकारणात आणल्यापासून त्यावर देशात चर्चा रंगत आहेत. यात आता बिहारच्या या मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करत वादाला निमंत्रण दिलं आहे.
नवी दिल्ली : प्रियांका गांधींच्या राजकीय एंट्रीने एकीकडे काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे भाजपमधून त्यांच्यावर वादग्रस्त वक्तव्यं सुरु झाली आहेत. सुंदरतेशिवाय प्रियांका यांचं काहीच कर्तृत्व नाही, असं वादग्रस्त विधान बिहारचे मंत्री विनोद नारायण झा यांनी पाटण्यात केलं आहे.
काँग्रेसनं प्रियांका गांधींना सक्रीय राजकारणात आणल्यापासून त्यावर देशात चर्चा रंगत आहेत. यात आता बिहारच्या या मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करत वादाला निमंत्रण दिलं आहे. सौंदर्यानं मतं मिळवता येतात, या चुकीच्या गृहितकावर काँग्रेस सध्या चालली आहे. पण निवडणूक ही सुंदरतेच्या बळावर जिंकता येत नाही, असा टोलाही विनोद झा यांनी काँग्रेसला लगावला आहे. प्रियांका या काहीही झालं तरी, घोटाळेबाज आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रॉबर्ट वाड्राच्या पत्नी आहेत, असंही विनोद झा म्हणाले. भारताची लोकशाही परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे, अशात काँग्रेसचा हा निर्णय लोकशाहीसाठी योग्य नाही, असेही झा यांनी म्हटले आहे. झा यांच्या आधी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही प्रियांका यांच्या राजकीय आगमनावर टीका केली होती. प्रियांका गांधी एक अशा महिला आहेत ज्यांच्या पतीवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे मोदींनी म्हटले होते.Bihar Min Vinod Narayan Jha on Priyanka Gandhi: Votes can't be won on basis of beautiful faces. Moreover, she is wife of Robert Vadra who is accused of involvement in land scam&several corruption cases. She's very beautiful but other than that she holds no political achievement. pic.twitter.com/vFzffKtdrJ
— ANI (@ANI) January 25, 2019
प्रियांका गांधी इंदिरा गांधींसारख्या दिसतात. मात्र कुणासारखे दिसण्याने त्यांच्यासारखे कर्तृत्व मिळवता येत नाही. असं असतं तर आपल्याकडे कितीतरी अमिताभ बच्चन आणि विराट कोहली असले असते असेही ते म्हणाले. इंदिरा गांधींसारख्या दिसण्यावरून त्यांनी हा टोमणा मारला होता.किसी की तरह दिखने से अगर कोई उसके जैसा काबिल हो जाता तो हमारे पास कई अमिताभ बच्चन और कई विराट कोहली होते। राजनीति में भी डुप्लीकेट नहीं चलता। प्रियंका गांधी भले इंदिरा जी की तरह दिखती हैं, लेकिन एक बड़ा फर्क है। इंदिरा जी के पति फिरोज गांधी अच्छे वक्ता और ईमानदार सांसद थे। वे.... pic.twitter.com/tZA9pcokXl
— Sushil Kumar Modi (@SushilModi) January 24, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement