एक्स्प्लोर

Bihar Election : मोठी बातमी,बिहारच्या मतदार यादीतून 51 लाख मतदारांची नावं हटवली, निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर

Bihar Polls : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं राज्याच्या मतदार यादीतून 51 लाख नावं विविध कारणांसाठी काढून टाकल्याचं जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं मतदार यादीचं स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन अभियान सुरु केलं आहे. निवडणूक आयोगानं एसआयआरद्वारे 51 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून हटवली आहेत. आयागोनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. निवडणूक आयोगानं एसआयर मध्ये 18 लाख नावं मृत मतदारांची आढळून आल्याचं म्हटलं. त्याशिवाय 26 लाख मतदार बिहारच्या बाहेर किंवा इतर मतदारसंघात स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळं त्यांची नावं हटवण्यात आली आहेत. याशिवाय 7 लाख मतदारांची नावं दोन ठिकाणी नोंदवली गेल्यानं ती हटवण्यात आली आहे. नियमानुसार एकाच मतदारसंघात नाव नोंदवता येतं. मात्र, नियमांचं उल्लंघन केल्यानं ही नावं हटवली गेली आहेत. म्हणजेच एकूण 51 लाख नावं बिहारच्या मतदार यादीतून हटवण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार बिहारमध्ये 7.89 कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी 97.30 टक्के मतदारांनी Enumeration Forms जमा केले आहेत. या फॉर्मची गरज 1 ऑगस्ट 2025 ला प्रकाशित होणाऱ्या प्राथमिक मतदार यादीत नावाचा समावेश आवश्यक आहे. आतापर्यंत 2.70 टक्के मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत.आयोगानं या प्रक्रियेला पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं. 98500 हून अधिक बीएलओ आणि 1.5 लाख बूथ लेवल एजेंटचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टानं 10 जुलै रोजी निवडणूक आयोगाला आधार कार्ड, मतदार कार्ड आणि रेशन कार्डला वैध कागदपत्र म्हणून मान्यता द्यावी असे निर्देश दिले होती. निवडणूक आयोगाचा मात्र याला आक्षेप आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

निवडणूक उपायुक्त संजय कुमार यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी म्हटलं की आता मतदार यादीची पडताळणी आणि सुधारणा केली जात आहे. सध्या ज्या लोकांकडे मतदान कार्ड आहे ते जुन्या मतदार यादीवर आधारित दिलं गेलं होतं. त्याचाच आधार नवी यादी बनवताना घेतला गेल्यास सर्व प्रयत्न फोल ठरतील असं म्हटलं.

निवडणूक आयोगानं रेशन कार्ड बाबत भूमिका मांडताना म्हटलं की रेशन कार्ड हे विश्वसनीय कागदपत्र नाही. मोठ्या संख्येनं बोगस कार्ड बनवण्यात आली आहे. या वर्षी भारत सरकारनं 5 कोटी बोगस रेशन कार्ड रद्द केल्याची माहिती देखील आयोगानं दिली. आयोगानं एसआयआर दरम्यान आधार, रेशन कार्ड, जुन मतदान कार्ड ही कागदपत्र स्वीकारणार असल्याचं म्हटलं. मात्र, त्यासोबत विश्वसनीय कागदपत्र द्यावं असं म्हटलं आहे. या कागदपत्रांना स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा निर्णय स्थानिक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांवर अवलंबून असेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Maharashtra Monsoon : यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकरी चिंतेत
Maharashtra Monsoon : यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकरी चिंतेत
Monsoon 2026 : शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर  
Monsoon 2026 : शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, भारतीय हवामान विभागाकडून पहिला अंदाज जाहीर  

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?
Pope Leo on Donald Trump: विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
RBI : आरबीआयकडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
RBI कडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर
Embed widget