Bihar Election : बिहारमध्ये NDA चे जागावाटप ठरलं, भाजप आणि नितीश कुमार समसमान जागा लढवणार, कुणाला किती जागा?
NDA Seat Sharing in Bihar : एनडीएमध्ये चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला 29 जागा देण्यात आल्या असून जीतन राम मांझी यांच्या हम पक्षाला 6 जागा देण्यात आल्या आहेत.

Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. भाजप (BJP) आणि जनता दल युनायटेड (JDU) प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उतरवणार आहेत. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (LJP-Ram Vilas) 29 जागा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला (HAM) आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला (RALOMO) प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत.
भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सांगितले की, एनडीएतील सर्व घटकांनी परस्पर सहमती आणि मैत्रीपूर्ण वातावरणात जागांचे वितरण पूर्ण केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत एकजुटीने लढण्याचा निर्धार एनडीएने केला आहे.
जागावाटपाचा तपशील (Seat Distribution Details)
भाजप (BJP) – 101 जागा
जदयू (JDU) – 101 जागा
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा
सौहार्दपूर्ण चर्चेनंतर निर्णय (Consensus Within NDA)
एनडीएच्या नेत्यांनी सांगितले की, बिहारमधील आगामी निवडणुकीसाठी ही वाटणी परस्पर विश्वास आणि सन्मानाच्या वातावरणात करण्यात आली. तावडे यांनी स्पष्ट केले की, आम्ही एकत्रितपणे निवडणुकीत उतरून विकासाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवू.
Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल
एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243
राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79
भारतीय जनता पक्ष (BJP) – 78
जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45
काँग्रेस (Congress) – 19
CPI (Marxist–Leninist) Liberation – 12
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4
CPI – 2
CPI (M) – 2
AIMIM – 1
अपक्ष आमदार (Independent MLA) – 1
Bihar Assembly Election Date : बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होणार आहे.
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांवर होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
बिहार निवडणुकीतील एनडीएची रणनीती (NDA Strategy for Bihar Election)
भाजप आणि जदयू या दोन प्रमुख पक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येत मतदारसंघनिहाय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. चिराग पासवान यांच्या पक्षालाही या वेळेस महत्त्वपूर्ण वाटा देऊन एनडीएने छोट्या पक्षांनाही आपल्यात सामावून घेतलं आहे.
ही बातमी वाचा:
























