एक्स्प्लोर
Advertisement
'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय
तीन वर्ष मनोहर पर्रिकरांनी भारताचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. या तीन वर्षाच्या कार्यकाळात पर्रिकरांनी भारतीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याचा चेहरामोहरा बदलला आहे.
पणजी : भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं आज रात्री कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. तीन वर्ष पर्रिकरांनी भारताचे संरक्षण मंत्रीपद भूषवले. या तीन वर्षाच्या कार्यकाळात पर्रिकरांनी भारतीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याचा चेहरामोहरा बदलला आहे. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक, राफेल खरेदी ते 40 वर्षांपासून रखडलेली 'वन रॅन्क वन पेन्शन योजना' लागू करणे, हे सगळे निर्णय पर्रिकरांनी घेतले आहेत.
सर्जिकल स्ट्राईक : उरी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवादी तळ उध्वस्त केले, संपूर्ण रात्रभर पर्रिकर सेनेच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते.
मणिपुरातली कारवाई : भारतीय सैन्याने मणिपूरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी ठार झाले.
राफेल खरेदी : राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीला पर्रिकरांनीच हिरवा कंदील दाखवला. 2016 मध्ये राफेल खरेदीपत्रावर पर्रिकरांनीच स्वाक्षऱ्या केल्या.
'वन रॅन्क वन पेन्शन' योजना : 40 वर्षांपासून रखडलेली 'वन रॅन्क वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीत पर्रिकरांचा सिंहाचा वाटा आहे.
वाचा : देशातला पहिला आयआयटीयन जो मुख्यमंत्री झाला,मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय
वाचा : मनोहर पर्रिकरांनी पुढाकार घेतला आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement