अयोध्या: अयोध्येमध्ये होणाऱ्या भूमीपूजनाची सुरुवात आजपासून होणार आहे. आज सकाळी 9 वाजता गणपती पूजन होणार आहे. ही पूजा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालणार आहे. यात विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत शुभकार्याची सुरुवात केली जाईल. या पूजेमध्ये 21 पुजारी सहभागी होतील. नंतर उद्या, मंगळवारी रामर्चा पूजन होईल. ही पूजा सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. ही पूजा जवळपास 5 तास सुरु राहील. यात 6 पुजाऱ्यांचा समावेश असेल. तर 5 ऑगस्टला बुधवारी, शुभमुहुर्तावर राममंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम होईल. या पूजेला देखील मर्यादित पुजाऱ्यांचा समावेश असेल.

भूमिपूजनाला उपस्थित मान्यवरांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावं नाहीत
अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं आता पाहुण्यांच्या यादीत नाहीत. या दोन्ही नेत्यांना कार्यक्रमाला येण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे त्यांची नावं यादीतून हटवण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले नेते उमा भारती आणि कल्याण सिंह यांची नावं पाहुण्यांच्या यादीत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संघाशी जोडलेल्या 10 जणांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबोले, कृष्ण गोपाल, अनिल ओक, लखनौचे प्रचारक अनिल कुमार यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे अलोक कुमार, दिनेश चंद्र आणि मिलिंद यांच्यासह सहा जणांना निमंत्रण आहे. याआधी तयार करण्यात आलेल्या यादीत अयोध्येच्या पाच आमदारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं होतं. मात्र आता केवळ अयोध्या शहराचे आमदार आणि महापौर यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. अयोध्येतील 52 संतांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे.


राम जन्मभूमीच्या पुजाऱ्यासह सुरक्षेतील 16 पोलिसांना कोरोनाची लागण


भूमिपूजनाच्या तयारीच्या गडबडीत याठिकाणी कोरोनाची एंट्री झाली आहे. राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास (Priest Pradeep Das) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. ते मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास देखील सत्येंद्र दास यांच्यासह राम जन्मभूमीची पूजा करतात. राम जन्मभूमीमध्ये मुख्य पुजाऱ्यांसह अन्य चार पुजारी रामललाची सेवा करतात.




राम जन्मभूमीच्या सुरक्षेतील 16 पोलिसांना कोरोनाची लागण
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुजारी प्रदीप दास यांना होम क्‍वारंटाईन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राम जन्मभूमीच्या सुरक्षा व्यवस्थेतील 16 पोलिस कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या आधी पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढल्याने खळबळ उडाली आहे.

Exclusive | राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रम कसा असणार? किती जण उपस्थित राहणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येला 

ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. परंतू सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लाऊन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबादपर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे.

Ram Mandir Ayodhya | राम मंदिरासाठी चांदीच्या विटा नको, पैसे द्या, राम मंदिर ट्रस्टचं लोकांना आवाहन

शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन

सकाळी राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर रात्री शरयू नदीच्या काठावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्येत मोठं मोठे कटआऊट लावण्यात येणार आहेत. हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक सोहळा करण्यासाठी आता भाजपकडून मोठया प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाचं अयोध्येत येतं आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरचं संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विशेष अतिथिच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याठिकाणी प्रत्येक खुर्चीमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हँडग्लोज, मास्क आणि सँनिटायझर वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक ते सर्व सुरक्षेचे उपाय अयोध्येत करण्यात आले आहेत.

हे ही वाचा- 


Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही


राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट कोणी पाठवली?


Ram Mandir | राममंदिराच्या भूमिपूजनाआधी अयोध्येतील पुजाऱ्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण