नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने पक्षातील आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्वीट करत अमित शाह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करत म्हटलं की, माननीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो.


काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "अमित शाह यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो."


Amit shah Corona Positive | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, अमितजी, तुमची चिकाटी व इच्छाशक्ती हे प्रत्येक आव्हानांसमोर एक उदाहरण आहे. आपण कोरोना व्हायरसच्या या मोठ्या आव्हानावर तुम्ही नक्कीच विजय मिळवाल, असा मला विश्वास आहे. तुम्ही लवकरात लवकर ठिक व्हाल, ही प्रार्थना.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं की, आम्ही सर्व तुमची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, यासाठी प्रार्थना करतो.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करतो.


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटल की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी प्रार्थना करते.