एक्स्प्लोर
Advertisement
33 ट्रकचालक-क्लीनर्सची हत्या, नऊ सीरिअल कीलर्सची टोळी जेरबंद
भोपाळ, नागपूर, अमरावती, नाशिकसह चार राज्यांमधील 33 ट्रकचालक-क्लीनर्सची गेल्या आठ वर्षांत हत्या करण्यात आली
भोपाळ : ट्रक चालक आणि क्लीनरची हत्या करुन लूटमार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा भोपाळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेल्या आठ वर्षांत 33 ट्रकचालकांची हत्या करणाऱ्या नऊ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चार महिन्यात 14 ट्रकचालकांना जीवे मारण्यात आलं.
भोपाळ, नागपूर, अमरावती, नाशिकसह आणखी काही शहरांमध्ये या घटना घडल्या होत्या. 30 वर्षीय जयकिरण प्रजापती आणि 50 वर्षीय आदेश खांब्रा या टोळीचे म्होरके आहेत.
अशी होती मोडस ऑपरेंडी
टोळीतील सदस्य ट्रक चालक आणि क्लीनरशी मैत्री करुन त्यांना जाळ्यात ओढत. संधी साधून ट्रकचालकांना झोपेचं औषध द्यायचं आणि त्यांची निर्घृण हत्या करायची, अशी टोळीची मोडस ऑपरेंडी (कार्यपद्धती) होती. त्यानंतर त्यांच्याकडील ऐवज लुटायचा, तसंच ट्रकचे सुटे भाग चोरुन महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशात विकायचे.
2010 पासून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगड या राज्यांतील 33 ट्रक चालक आणि क्लीनरची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. गेल्या चार महिन्यांतरच हत्येच्या 14 घटना घडल्या. हत्या झालेल्या ट्रक चालकांची नोंद त्यांनी एका डायरीत केली होती. पोलिसांनी ही डायरी प्रजापतीकडून जप्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement