एक्स्प्लोर

ब्रेक घेत गँगरेप नाही, सहमतीने दोघांशी सेक्स, डॉक्टरचा अहवाल

तक्रार दाखल झाल्यानंतर केलेल्या पहिल्या वैद्यकीय अहवालात तिने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचं म्हटलं होतं.

भोपाळ : गेल्या आठवड्यात भोपाळमध्ये युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश हादरला होता. मात्र पीडितेवर गँगरेप झाला नसून दोन आरोपींशी तिने सहमतीने सेक्स केलं, असा धक्कादायक वैद्यकीय अहवाल देण्यात आला. त्यानंतर, हा अहवाल एका ज्युनिअर डॉक्टरची चूक असल्याचं सांगत सारवासारव करण्यात आली आहे. ज्युनिअर डॉक्टरच्या नावावर बिल फाडत भोपाळमधील सरकारी रुग्णालयाने हात झटकले आहेत. संबंधित अहवालातील चूक तात्काळ सुधारण्यात आली, असंही सुलतानिया रुग्णालयाचे अधीक्षक करण पीपरे यांनी सांगितलं. 31 ऑक्टोबर रोजी चार नराधमांनी 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे चहा, गुटखा, सिगरेटसाठी ब्रेक घेऊन आरोपींनी पीडितेवर तीन तास अत्याचार केला. महत्त्वाचं म्हणजे पीडित तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक (PSI) तर आई गुन्हे अन्वेषण विभागात (CID) कार्यरत आहे. आयपीएसचा अभ्यास करणारी पीडित विद्यार्थीनी कोचिंग क्लासवरुन परत येत होती. त्यावेळी चार नराधमांनी हबीबगंज रेल्वे स्टेशनजवळून तिचं अपहरण केलं. तिला ट्रॅकजवळ निर्जन स्थळी नेऊन एका ब्रिजखाली तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

टी-सिगरेट ब्रेक घेत, चार नराधमांकडून तीन तास बलात्कार!

पीडित तरुणी कशीबशी पोलीस स्टेशनला पोहोचली, मात्र इथेही पोलिसांनी तिला हद्दीवादावरुन नागवलं. तीन पोलीस स्थानकांनी हा भाग आमच्या हद्दीत नसल्याचं कारण देत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एका पोलिस अधिकाऱ्याने तर ही स्टोरी फिल्मी असल्याचा टोमणा मारला. एफआयआर दाखल करण्यात 11 तासांचा विलंब केल्याने दहा पोलिस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असून तिघांची बदली करण्यात आली आहे. पोलिस असलेल्या आई-वडिलांनीच दोघा आरोपींची धरपकड केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्रं हलवली. गोलू चाधर, अमर, राजेश आणि रमेश अशी या नराधमांची नावं आहेत. या चारही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे गोलू हा स्त्रीभ्रूण हत्येतीतीलही आरोपी असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर केलेल्या पहिल्या वैद्यकीय अहवालात तिने संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचं म्हटलं होतं. 'ही चूक आहे, पण ती दुरुस्त करण्यात आली आहे. भविष्यात वरिष्ठ महिला डॉक्टर आणि तिची टीम अशा संवेदनशील प्रकरणात चौकशी करेल, असे आदेश आम्ही दिले आहेत' असंही सुलतानिया रुग्णालयाचे अधीक्षक करण पीपरे यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सWalmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Embed widget