एक्स्प्लोर

भारत बंद : आंदोलकांचा रास्तारोको, दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला बिहारमध्ये फार हिंसक वळण मिळालं. विरोधकांनी अनेक ठिकाणी चक्काजाम केला, रेल्वे रोखल्या.

पाटणा : बिहारच्या जहानाबादमध्ये भारत बंदमुळे झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत अडकल्याने दोन वर्षांच्या एका आजारी मुलीचा मृत्यू झाला. मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना, ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने मुलीने रस्त्यातच प्राण सोडले. विनंती करुनही आम्हाला जाऊ दिलं नाही बंददरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय तिला घेऊन जहानाबादमधील सदर रुग्णालयात घेऊन जात होते. परंतु आंदोलकांनी रस्ता रोखल्याने त्यांची गाडी त्यात अडकली. मुलीचे वडील प्रमोद मांझी यांनी सांगितलं की, "माझ्या मुलीला डायरिया झाला होता आणि तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं गरजेचं होतं. आम्ही तिला जहानाबादच्या सदर रुग्णालयात घेऊन जात होता. पण आंदोलकांनी अनेक ठिकाणी रिक्षा थांबवली. आम्हाला जाऊ द्या, अशी विनंती करत होतो. पण एकानेही ऐकलं नाही. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास आम्हाला उशिर झाला आणि तिचा मृत्यू झाला. जर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं असतं, तर तिचा जीव वाचला असता." तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाने मुलीच्या मृत्यूचं खापर कुटुंबीयांवरच फोडलं. मुलीचे कुटुंबीय तिला घेऊन घरातून उशिरा बाहेर पडले होते. त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा दावा जहानाबादचे उपविभागीय दंडाधिकारी परितोष कुमार यांनी केला आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला बिहारमध्ये फार हिंसक वळण मिळालं. विरोधकांनी अनेक ठिकाणी चक्काजाम केला, रेल्वे रोखल्या. पाटणासह अनेक परिसरांमध्ये विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. मुलीच्या मृत्यूवर भाजपने काँग्रेसला घेरलं मुलीच्या मृत्यूवरुन केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. "हिंसा आणि मृत्यूच्या खेळासाठी जबाबदार कोण आहे? औषधांचं दुकान आणि अॅम्ब्युलन्स रोखलं जात नाही. बिहारच्या जहानाबादमध्ये काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अॅम्ब्युलन्सला रस्ता दिला नाही. यामुळे त्या छोट्या मुलीचे प्राण गेले. यासाठी जबाबदार कोण आहे? हिंसेचा हा खेळ थांबायला हवा. देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जनतेची साथ मिळाली नाही तर हिंसेचं प्रदर्शन करुन बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही जनतेच्या अडचणींसोबत आहोत. यावर उपाय काढण्याच्या प्रयत्न करत आहोत आणि काढू," असं रवीशंकर प्रसाद म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget