एक्स्प्लोर

Bengaluru Rain : मुसळधार पावसामुळं बंगळुरुमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी पूरस्थिती, पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

बंगळुरुमध्ये (Bengaluru) देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Bengaluru Rain : एकीकडे आसासमध्ये पुराच्या पाण्यानं थैमान घातलं असतानाच दुसरीकडे बंगळुरुमध्ये (Bengaluru) देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर पुरामुळे बंगळुरु आणि आजुबाजुच्या परिसरातलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तसेच एक बस पुराच्या पाण्यात अडकल्याचा व्हीडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये पुराचं पाणी चालकाच्या सीटपर्यंत आल्याचं या व्हीडिओमध्ये पाहयला मिळत आहे. 

दरम्यान, हवामान खात्याकडून बंगळुरुला पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आसाममध्ये आधीच पुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकजे कर्नाटकमध्ये देखील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे वाहनं पाण्याखाली गेली आहेत. तर बंगळुरुत एक बस पुराच्या पाण्यात अडकल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. या पुरामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे. 

Bengaluru Rain : मुसळधार पावसामुळं बंगळुरुमध्ये जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी पूरस्थिती, पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

वातावरणात सातत्याने बदल

दरम्यान, वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी कडक ऊन पडत आहे तर कधी पावसाची चिन्ह दिलसत आहेत. अशातच बेंगलोरमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर भारतात आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पुराने कहर केला आहे. आता कर्नाटकातील बंगळुरुमध्येही तीच स्थिती आहे. काही तासांच्या पावसानंतर येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवासी भागात पाणी तुंबले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांची घरे जलमय झाली आहेत. तसेच काही ठिकाणी स्त्यावर  गुडघ्यापर्यंत पाणी असल्याचे चित्र दिसत आहे.

20 ते 22 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

कर्नाटक हवामान विभागाच्या प्रमुख डॉ. गीता अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहिती नुसार, पुढील दोन दिवस राज्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 ते 22 मे दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, पुढील दोन दिवस राज्याच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात दक्षिण भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget