एक्स्प्लोर
कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना बेळगावात कार कालव्यात कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर कार चालक बाहेर पडून पोहत किनाऱ्यावर आल्यामुळे त्याचा जीव वाचला.

बेळगाव : नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारावरुन परतताना बेळगावातील कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव कार कालव्यात कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कारचालक बचावला. गोकाकमध्ये अंत्यसंस्काराला जाऊन परतत येताना सौंदत्ती जवळील कडबी गावाजवळ ही दुर्घटना घडली. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार कालव्यात कोसळली. कालव्यात पाणी असल्यामुळे कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांना जीव वाचवण्याची संधी मिळाली नाही. कार चालक मात्र बाहेर पडून पोहत किनाऱ्यावर आल्यामुळे त्याचा जीव वाचला. अपघातात फकिरप्पा पुजेरी, हनुमंत पुजेरी, लगमण्ण पुजेरी, पारव्वा पुजेरी, लक्ष्मी पुजेरी यांचा मृत्यू झाला. कारचालकाने माहिती दिल्यावर ग्रामस्थांनी कार बाहेर काढली. मुरगोड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
आणखी वाचा























