एक्स्प्लोर
जीएसटीपूर्वी बंपर सूटचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड
मुंबई : 1 जुलैपासून जीएसटी लागू होण्याआधी बंपर सूटला ऊत आला आहे. महाराष्ट्रभर इलेट्रॉनिक्स वस्तूंपासून सर्वच उत्पादनांवर 50 ते 60 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.
जीएसटीच्या पार्श्वभूमीवरजाहीर केलेल्या डिस्काउंट ऑफरला ग्राहकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे स्वतात वस्तू मिळत असल्याने नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडाली आहे.
प्री जीएसटी ऑफरमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने ग्राहकांनी भरुन गेली आहे. दरम्यान, जीएसटी लागू होण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने दुकानांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
कपड्यांपासून गाड्या, घड्याळावंर मोठी सूट मिळत आहे. कार, स्कूटर, मोटरसायकलही आज तुम्हा स्वस्त मिळणार आहे. काही ठिकाणी स्कूटर, मोटरसायकलवर 2,500 रुपयांपासून 5,000 पर्यंतची सूट मिळत आहे. दरम्यान सर्व वाहनं 1 जुलैपासून महाग होणार आहेत.
ऑनलाईन शॉपिंगवरही तुम्ही या डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकता.
30 जूनला मध्यरात्री राजधानी दिल्लीत जीएसटीचं अधिकृतरित्या लॉन्चिंग होणार आहे. यानंतर 1 जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमात जीएसटी लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement