एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीवर बंदी घाला : काँग्रेस खासदार
नवी दिल्ली : सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी आज राज्यसभेत करण्यात आली. अशा प्रकारची उत्पादनं आणि त्यांच्या जाहिराती महिलांना कमी लेखणाऱ्या असल्याचा आरोप काँग्रेस खासदार विप्लव ठाकूर यांनी केला आहे.
पॉन्ड्स आणि फेअर अँड लव्हली या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत महिलांना कमी लेखण्यात येतं, असं विप्लव ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितलं.
प्रत्येक फेअरनेस क्रीम स्त्रियांना सुंदर बनवण्याचे दावा करतात, पण त्याचा पाठपुरावा कुणीच करत नाही. अशा प्रकारच्या जाहिराती थांबल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर तात्काळ बंदी घातली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
ही उत्पादनं स्त्रियांमध्ये न्यूनगंड निर्माण करतात. सौंदर्यप्रसाधनांची संबंधित संस्थांकडून तपासणी केली जावी, तसंच खोटे दावे करणाऱ्या या उत्पादनांवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणीही खासदार ठाकूर यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement