एक्स्प्लोर

Baramulla Encounter: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सैन्य दलाला मोठं यश! एका दहशतवाद्याचा खात्मा, शोधमोहिम सुरूच

Baramulla Encounter: बारामुल्लाच्या उरी, हातलंगा भागात दहशतवादी आणि लष्कर, पोलीस जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार या भागात दोन दहशतवादी दिसले.

Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) उरी, बारामुल्ला येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. लष्कर आणि पोलिसांनी या परिसरात दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम (Search Operation) सुरू केली आहे. लष्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया साइट X (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. 

हातलंगा भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरू
काश्मीर दक्षिण क्षेत्र पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईचा भाग म्हणून उरीच्या हातलंगा भागात दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. यामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले होते, त्यापैकी एक दहशतवादी मारला गेला आहे. असं पोलीसांकडून समजते.

दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष
तर अनंतनागच्या कोकरनागमध्येही जवानांनी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहिम हाती घेतली आहे. चौथ्या दिवशीही सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांवरही आकाशातून लक्ष ठेवण्यात येत आहे. अनंतनागच्या डोंगराळ भागातील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, या भागात लपलेल्या प्रत्येक दहशतवाद्याचा खात्मा केला जाईल.

उंचावरून दहशतवाद्यांकडून गोळीबार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागच्या डोंगराळ भागात लपलेले दहशतवादी उंचावरून गोळीबार करत आहेत. या चकमकीत लष्करातील एक कर्नल, एक मेजर, जम्मू-काश्मीर पोलीस डीएसपी आणि एक जवान शहीद झाला आहे. या घटनेनंतर पॅरा कमांडोना तत्काळ पाचारण करण्यात आले. इथल्या डोंगराळ भागात दहशतवादी जास्त उंचीवर लपून बसल्याने त्यांचे नेमके ठिकाण निश्चित होत नाही, तसेच ते त्यांचे ठिकाण सतत बदलत असतात. दहशतवादी उंचीवर असल्याने कारवाईदरम्यान लष्कर आणि पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात ते यशस्वी झाले, ज्याचा परिणाम लष्करी जवान शहीद झाले.

बुधवारी तीन अधिकारी शहीद

बुधवारी (13 सप्टेंबर) अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे एकूण तीन अधिकारी शहीद झाले. यामध्ये 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धनोक आणि डीएसपी हुमायून मुजम्मिल भट्ट यांचा समावेश होता. या कारवाईदरम्यान एक जवानही शहीद झाला. मात्र, त्याची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Anantnag Encounter : अनंतनागमध्ये सापडला जवानाचा मृतदेह, शहीद जवानांची संख्या आता 4 वर, पोलीसांचा खबरी निघाला देशद्रोही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादThane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP MajhaAmol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हेJalgaon Loksabha Voting Center : मतदान केंद्रावर बालसंगोपन, महिला मतदात्यांचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Embed widget