एक्स्प्लोर

बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार

मुंबई : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. आज सकाळी आठ वाजता बँका सुरु होणार आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत बँकेत एका वेळी चार हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळतील. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने काल बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज नोटा बदलण्यासाठी तसंच पैसे जमा करण्यासाठी  बँके आणि पोस्ट ऑफिसमध्ये चांगलीच झुंबड उडणार आहे. आजपासून ते 30 डिसेंबरपर्यंत नागरिकांना त्यांच्याकडून पाचशे आणि हजारांच्या बदलून मिळणार आहेत. यासोबतच दोन हजारच्या नव्या नोटा आजपासून चलनात येणार आहेत. एटीएम अजूनही बंद दरम्यान, बँका सुरु झाल्या असल्या तरी बहुतांश एटीएम आज बंद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीपाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बंद केल्याचं जाहीर केल्यानंतर बुधवारी (9 नोव्हेंबर) रोजी देशभरातील सर्व एटीएम बंद होते. आज एटीएम सुरु होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती, परंतु आजही बरेचसे एटीएम बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

शनिवार-रविवारीही बँका सुरु

हजार-पाचशेच्या नोटा बंद केल्यानंतर आणि बँका बंद असल्याने झालेली कोंडी फोडण्यासाठी शनिवारी आणि रविवारी देशातील सगळ्या बँका उघड्या ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी रविवारीही बँकेत जाता येणार आहे.

सध्या पाचशे-हजारच्या नोटा कुठे चालतील?

बँक  आणि पोस्ट ऑफिस तुमचं खातं असलेल्या कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेत 30 डिसेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून घेता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेने जारी केलेला फॉर्म भरून द्यावा लागेल. केवळ पैसे बदलण्यासाठीच हा फॉर्म भरावा लागेल. तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील, तर या फॉर्मची गरज नाही. पैसे बदलण्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड किंवा मान्यताप्राप्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे 500 रुपयाच्या 20 नोटा म्हणजे 10 हजार रुपये असतील, तर त्यापैकी 4000 रुपयेच एका दिवसात बदलून मिळतील. म्हणजे तुमच्याकडच्या 500 रुपयाच्या 8 नोटाच बँकेत/पोस्टातून एका दिवसात बदलून घेता येऊ शकतील. परत दुसऱ्या दिवशी हीच प्रक्रिया असेल. पण तुम्ही तुमच्या खात्यावर कितीही रक्कम भरू शकता. केवळ बदलून घेण्यासाठीच 4 हजार रुपयांची ही मर्यादा असेल. 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरपर्यंत दिवसाला 4 हजार रुपये तुम्ही बदलून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये वाढ होईल. पैसे बदलण्यासाठी मर्यादा, मात्र अकाऊंटमध्ये भरण्याला नाही बँकेतून पैसे बदलून घेण्यासाठी मर्यादा आहेत, मात्र तुमच्याकडे 500 किंवा हजार रुपयाच्या कितीही नोटा असतील, तर त्या डिपॉझिट करण्यासाठी किंवा खात्यावर भरण्यासाठी मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्याकडील सर्व पैसे तुमच्या खात्यावर भरल्यास काहीही अडचण नाही. खात्यावरुन किती पैसे काढू शकाल? तुम्ही तुमच्या खात्यावरील दिवसाला 10 हजार रुपये आणि आठवड्याला 20 हजारपर्यंतची रक्कम काढू शकाल. समजा तुम्ही उद्या 8 हजार रुपये काढले, तर तुम्हाला आठवडाभरात 12 हजार रुपयेच काढता येतील. पण प्रत्येकवेळी तुम्हाला दहा हजारची मर्यादा असेल.(त्यामुळे 12 हजार काढायचे असतील तर दहा हजार निघतील, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन हजार काढावे लागतील) त्यानंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा 20 हजार रुपये काढता येतील. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल. प्रत्येक एटीएमवरुन दिवसाला 2 हजार रुपयांची मर्यादा तुमच्या अकाऊंटवर कितीही रुपये असले तरी एटीएमवरुन तुम्ही दिवसाला एका कार्डवरुन 2 हजार रुपयेच काढू शकाल. 18 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा असेल.त्यानंतर ही मर्यादा 4 हजारपर्यंत वाढवण्यात येईल. ही मर्यादा नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत असेल. त्यानंतर कोणतीही मर्यादा नसेल. संबंधित बातम्या

तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?

नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार

500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला

एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी

टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप

आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक

देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प

कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द

महत्त्वाच्या बातम्या

हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Embed widget