Bank Union Strike: खासगीकरणाविरोधात बँका दोन दिवसांच्या संपावर; 'या' दोन दिवशी व्यवहार होणार ठप्प
Bank Strike : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी 23 आणि 24 फेब्रुवारीला दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
नवी दिल्ली : सार्वजनिक बँकाच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील बँक कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आ (Bank Strike)आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (AIBEA) च्या केंद्रीय कमिटीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व बँक कर्मचारी 28 आणि 29 मार्चला संपावर जाणार आहे. बँकांच्या खासगीकरणाच्या विरुद्ध हा संप पुकारण्यात आला आहे. देशातील सर्व खासगी बँका या दरम्यान बंद राहणार आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात केली होती घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे. याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काही मोजक्याच बँका ठेवणार आहे. इतर बँकांचे विलनीकरण अथवा खासगीकरण करण्याचे सूतोवाच याआधीच करण्यात आले आहे.
बँकाच्या खासगीकरणाबाबत यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने (UFBU) संप पुकारला आहे. UFBU हा सरकारी बँकांच्या हे यूनियनचा संयुक्त मंच आहे. UFBU ने 23 आणि 24 फेब्रुवारीला संप पुकारणार आहे. या अगोदर यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात 15 आणि 16 मार्च 2021 संप पुकारला होता. त्यानंतर 16 आणि 17 2021 डिसेंबरला बँकिंग कायदा अधिनियम 2021 च्या विरोधात संप पुकारला होता.
काय आहे संपाचे कारण?
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआईबीओसी) ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती.
पगारवाढीसह नव्हे तर लोकांसाठी संप
हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. या देशातील सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : गेल्या 24 तासात देशात 71 हजार 365 कोरोना रुग्णांची नोंद, 1217 जणांचा मृत्यू
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
- Hijab Controversy : आक्रमक जमावाला सामोरं जाणारी 'ती' युवती कोण? काय आहे कर्नाटक हिजाब प्रकरण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha