एक्स्प्लोर
दोन हजाराच्या नव्या नोटांवरुन गांधीजींचा फोटो गायब
भोपाळ : मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये नव्या नोटांसंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या नोटांवरुन गांधींजींचा फोटोच गायब असल्यानं खळबळ उडाली आहे.
म्हैसूर प्रेसमधून छापून आलेल्या जवळपास 6 नोटा आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती पडल्या आहेत. बँकांनी ही प्रिटिंग मिस्टेक असल्याचं सांगत नोटा पुन्हा बँकेत जमा करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान या नोटा बनावट असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे.
2000 च्या नव्या नोटेतील चिपचं व्हायरल सत्य
लक्ष्मण या शेतकऱ्याला स्टेट बँकेतून 6 हजार रुपये काढले. बँकेने त्यांना दोन हजाराच्या तीन नोटा दिल्या. नोटा मिळाल्या तेव्हा लक्ष्मण यांच्या काहीही लक्षात आलं नाही. मात्र लक्ष्मण जेव्हा घरी गेले, तेव्हा त्यांच्या मुलाने नोटा पाहिल्या आणि त्यांना शंका आली. कारण त्या नोटांवर गांधीजींचा फोटोच नव्हता. नोटांवर गांधीजी नसल्यामुळे त्यांनी तातडीने बँकेत धाव घेतली. बँकेत या नोटांची तपासणी सुरु असतानाच, दुसरा एक गुरमीत सिंह नावाचा शेतकरी दोन हजाराच्या नोटा घेऊन बँकेत पोहोचला. त्या नोटांवरही गांधीजींचा फोटो नव्हता. बँकेने त्या नोटा परत स्वीकारुन ही छपाईतील चूक असल्याचं सांगितलं. 94 टक्के जुन्या नोटा बँकेत परत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 30 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांमध्ये 14.5 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. एकूण 15.44 कोटी लाख रुपयांपैकी 94 टक्के जुन्या नोटा आता आरबीआयकडे जमा झाल्याचं ‘बिजनेस स्टँडर्ड’ने म्हटलं आहे. आरबीआयकडे आतापर्यंत किती जुन्या नोटा जमा झाल्या याची पुन्हा एकदा मोजणी करुन अंतिम आकडा लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. एकूण जुन्या चलनाच्या 94 टक्के नोटा 50 दिवसांमध्ये नागरिकांनी जमा केल्या आहेत. 8 नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा 15.44 कोटी लाख रुपये किंमतीच्या जुन्या नोटा चलनात होत्या. अंतिम आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. कारण 8 नोव्हेंबरपासून 50 दिवस परदेशात असणारे नागरिक 30 मार्चपर्यंत जुन्या नोटा जमा करु शकणार आहेत. तर अनिवासी भारतीय 30 जूनपर्यंत जुन्या नोटा जमा करु शकतील. शिवाय काही ठिकाणी नोटांचं डबल काऊंटिंग झालं असण्याची शक्यता अर्थमंत्रालयाने वर्तवली आहे, ज्याची पडताळणी आरबीआयकडून सुरु आहे. संबंधित बातमीबँकांकडे एकूण जुन्या चलनापैकी 94 टक्के नोटा जमा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement