एक्स्प्लोर
Advertisement
दिवसाला 50 हजाराहून अधिक रक्कम बँकेत जमा करणाऱ्यांवर नजर
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर आहे. एका दिवसात 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम अकाऊंटमध्ये जमा करणाऱ्या खातेधारकाची माहिती आयकर विभागाला देणं बँक किंवा पोस्ट ऑफिसला बंधनकारक करण्यात आले आहे.
खातेधारकांना दिवसाला 50 हजार रुपयांची रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात जमा करता येणार आहे. रक्कम जमा करण्याची ही मर्यादा सेव्हिंग आणि करन्ट अशा दोन्ही खाते प्रकारासाठी लागू आहे.
सरकारने याआधी स्पष्ट केलंय की, खातेधारक आपल्या खात्यात हवी तेवढी रक्कम जमा करु शकतात. मात्र, त्यावर आयकर विभागाची नजर असेल. शिवाय, खात्यात जमा केलेली रक्कम योग्य मार्गाने कमावलेली आहे, हे खातेधारकांना सिद्धही करावे लागेल.
अगदी काही वेळापूर्वीच आरबीआयने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून केवळ 4 हजार 500 रुपयेच बदलून मिळतील. त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास आपापल्या खात्यात जमा करावी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
वाशिम
Advertisement