![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
LIVE | Bharat Bandh | यंदाचे 100 वे नाट्यसंमेलन सांगलीत
LIVE
![LIVE | Bharat Bandh | यंदाचे 100 वे नाट्यसंमेलन सांगलीत LIVE | Bharat Bandh | यंदाचे 100 वे नाट्यसंमेलन सांगलीत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/29134004/Bandh.jpg)
Background
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे. या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे.
आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळू शकतो.
आम्ही भारत बंद पाळणार नाही : परळी व्यापारी संघटना
सततच्या बंदचा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आहे. 29 जानेवारी रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत, असं निवेदन परळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिलं आहे. सरकारविरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्याला भोगावा लागतो. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे. 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत, असं निवेदनात म्हटले आहे.
आम्ही बंदला पाठिंबा देणार नाही, उदगीरच्या व्यापाऱ्यांची भूमिका
सध्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एनआरसीला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे बंद केले जात आहे. दर दोन दिवसांनी कोणता तरी पक्ष किंवा संघटना बंद पुकारत असतो यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाही, कोणी आमच्या व्यापारी प्रतिष्ठानवर दगडफेक केल्यास आणि नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहिल, असं निवेदन उदगीरच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
भारत बंदची पत्रकं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण
बदलापुरात भारत बंदसाठी पत्रकं वाटताना बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पूर्वच्या शिवाजी चौकात एका गाडीतून आलेल्या चार ते पाच जणांनी हॉकी स्टिक, रॉडने कार्यकर्त्यांना केली. तसंच पत्रकं फाडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)