एक्स्प्लोर

India Weather : उत्तर भारतात मुसळधार पाऊस, काही भागात रस्त्यांना नदीचं स्वरुप, वाहतुकीवर परिणाम 

India Weather : उत्तर भारतात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावासामुळं काही भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

India Weather : देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. विशेषत: उत्तर भारतात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावासामुळं काही भागात पाणी साचलं आहे, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं असून, रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात आजही मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच हिमाचल प्रदेशसह दिल्ली, उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच चंदीगड, मोहाली, पंचकुला परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा 

हवामान खात्याने देशाच्या उत्तर ते दक्षिणेकडे 25 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळम या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

पावसामुळं रस्त्यांना नदीच स्वरुप, युवकाने रस्त्यावर चालवली बोट 

दरम्यान पावसानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि नोएडाच्या काही भागात पाणी साचले आहे. या पावसामुळं दिल्लीतील 25 हून अधिक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं गुरुग्राममधील नरसिंगपूरसह काही भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळं काही भागातील  व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका व्हायर झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्यावर बोट चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ फरीदाबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस

राज्याच्या विविध भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. काही भागात चांगला पाऊस पडत आहे, तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे, तर कुठे अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दे्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा; वाचा हवामान विभागाचा अंदाज 

महत्त्वाच्या बातम्या

High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Miss World 2026 :  डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
डोमिनिकन रिपब्लिकच्या शिरपेचात मानाचा तुरा, जोहेरी मोला डोमिंग्वेझच्या डोक्यावर मिस वर्ल्ड 2026 मुकूट
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court: केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई, दिल्लीसह देशभरातील 8 उच्च न्यायालयांमध्ये मोठे बदल, मुख्य न्यायमूर्तींची घोषणा, कोणत्या राज्यात कोण स्वीकारणार पदभार?
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv: आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
आईनं आधी चिमूरड्यांना बुरुजावरून ढकललं नंतर उडी घेतली; दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...., मेंदूमधील तीव्र रक्तस्त्रावाने वीराचा मृत्यू
ketan agrawal case : केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
केतन अग्रवालला संपवण्यात सिया चेतनसोबत तिसऱ्याचाही हात? बीडच्या मित्राकडे तपास सुरू, मोठी माहिती समोर येण्याची शक्यता
Dahihandi 2026 : दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू, तर 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
दहीहंडी उत्सवाच्या आनंदात विरजण! मुंबईत दोन गोविंदाचा मृत्यू; 306 गोविंदा जखमी, तर 49 जणांवर अद्याप उपचार सुरु
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
Dhananjay Mahadik and Krishnaraj Mahadik: आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
आधीच कृष्णराज महाडिकांवर भाजपश्रेष्ठींची नाराजी, आता धनंजय महाडिकांची भाषणावेळी घोडचूक, म्हणाले....
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Maharashtra Live blog updates: महापौर रितू तावडेंकडून केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या प्रकृतीची विचारपूस
Embed widget