एक्स्प्लोर
जेट एअरवेजच्या विमानात बाळाचा जन्म, आयुष्यभर मोफत प्रवास
मुंबई : जेट एअरवेजच्या विमानात एका प्रवासी महिलेनं मुलाला जन्म दिला आहे. सौदी अरेबियातील दमामहून कोचीला जाणाऱ्या विमानात बाळाचा जन्म झाला. जेट एअरवेजने बाळाला आजन्म मोफत विमान प्रवास देण्याची घोषणा केली आहे.
पहाटे 2.55 वाजताच्या सुमारास एका गर्भवतीला प्रीमॅच्युर प्रसुतीकळा येऊ लागल्या. त्यावेळी विमान अरबी समुद्रावर 35 हजार फुटांवरुन प्रवास करत होतं. विमानातल्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं विमान जवळ असलेल्या मुंबई विमानतळाकडे वळवलं.
महिलेला प्रसुतीकळा सुरु होताच कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. दमाम-कोची 9W 569 या विमानात 162 प्रवासी होते, मात्र डॉक्टर नव्हता. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या केरळमधील एका नर्स आणि इतर महिलांच्या मदतीनं या महिलेची प्रसुती पार पडली.
या महिलेनं विमानातच गोंडस बाळाला जन्म दिला. मुंबई विमानतळावरुन उतरताच बाळ-बाळंतीणीला रुग्णालयात रवाना करण्यात आलं. आई आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
जेट एअरवेजच्या विमानात जन्माला आलेलं पहिलंच बाळ असल्यामुळे कंपनीने त्याला जेट एअरवेजच्या कोणत्याही विमानाने आजन्म मोफत प्रवास करु देण्याची घोषणा केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
पुणे
Advertisement