एक्स्प्लोर

Pulwama terror attack : दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जबाबदार : आझम खान

जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या हल्ला केला, या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

लखनौ : जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरातून बदल्याची मागणी होत असताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य करुन देशवासियांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आझम खान रामपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी अझम खान यांनी या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. अझम खान म्हणाले की, "अशी एखादी घटना होणारच होती." आझम खान म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या स्वतःच्या राजकीय कामांसाठी देशातील तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणांचा वापर करत आहेत. मोदींनी तपास यंत्रणांना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राबर्ट वाड्रा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मागे लावले आहे. तपास यंत्रणा वाड्रा, बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासंबधी तपास करत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न मागे पडला. परिणामी पुलवामासारखा हल्ला होणारच होता. त्यामुळे या घटनेला मोदीच जबाबदार आहेत." आझम खान पुलवामा हल्ल्यासंदर्भात अशा प्रकारे बरळल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. एकीकडे देश दुःखात बुडाला असताना आझम खान यांनी असे वक्तव्य करायला नको होते, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष सध्या सरकारसोबत उभे आहेत, परंतु आझम खान मात्र सरकारला दोषी ठरवण्यात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget