दर्शनापासून ते मुक्कामापर्यंत ; 22 जानेवारी अन् प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यासंदर्भातील 22 प्रश्न; तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!
Ayodhya Ram Mandir : अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालंय. परंतु राम मंदिराच्या उद्घाटनानंतर तुमच्या आमच्या मनात अनेक प्रश्न असतील तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या मनातील 22 प्रश्नांची उत्तरे देणार आहे.
सामान्य नागरिकांना 23 जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे दर्शन खुले होणार आहे. राम भक्तांची गर्दी पाहता दर्शनाची वेळ देखील वाढवण्यात येणार ( नीतीश कुमार, DM, अयोध्या)
प्राणप्रतिष्ठापनेनंतर सर्वप्रथम VIP आणि VVIP दर्शन VIP दर्शनानंतर संताचे दर्शन होणार साधू संताच्या दर्शनानंतर सामान्य नागरिकांसाठी दर्शन खुले होणार (आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, श्री राम मंदिर)
राम मंदिर ट्रस्टकडून भाविकांसाठी हॉटेल आणि टेन्टची व्यवस्था केली आहे
प्रभू श्रीरामाचे दर्शनासाठी गर्दी होणार नाही, यासाठी वेगवेगळ्या रांगा असणार (लल्लू सिंह, सांसद, अयोध्या) मंदिर 12 ते 14 तास भाविकांसाठी खुले असणार आहे (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)
प्राचीन काळापासून आम्ही तिथे पुजा करत आहे. जिथे रामजन्मभूमी आहे, तिथेच प्राणप्रतिष्ठा होणार आहे (महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या)
जुन्या सर्व मूर्ती नव्या मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या) 21 जानेवारीला उत्सव मूर्ती गर्भगृहात आणली आहे (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)
प्रभू श्रीराम सूर्यवंशी होते यासाठी सूर्य तिलक करण्याची परंपरा आहे (महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या) रामनवमीच्या दिवशी 12 वाजता सूर्याची किरणे सूर्य तिलक होणार (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)
दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 11, दुपारी 2 ते संध्याकाळी 7 आरतीची वेळ दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 (नीतीश कुमार, DM, अयोध्या)
राम दरबारात चार भावंड, सीतामाई, हनुमान आणि सखा (महंत राजू दास, हनुमानगढी,अयोध्या)
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त राजयोग कारक आहे.ज्यामुळे मंदिरावर भविष्यात कोणतीही आपत्ती येणार नाही. प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त शुभ असून असून सर्वांवर त्याचा चांगला प्रभाव असणार आहे. (पंडित गणेश्वर शास्त्री, मुहूर्त काढणारे ज्योतिषी) 12.30 नंतर संजीवनी लग्न आहे (लक्ष्मीकांत दीक्षित शास्त्री)
1 मार्च 1992 पासून सत्येंद्र दास मुख्य पुजारी 4 पुजारी, दोन कर्मचारी, भंडारी आणि कोठारी आहे. सध्या मंदिराच्या व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही (आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, श्री राम मंदिर)
20 पुजाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. राममंदिर ट्रस्टकडून सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुजारींची नियुक्ती ट्रस्टकडून करण्यात येणार (आचार्य सत्येंद्र दास, मुख्य पुजारी, श्री राम मंदिर)
आचार्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक, उत्तरप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री
आरती रोज दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता आरतीसाठी विशेष पासची व्यवस्था असणार आहे
प्रभू श्रीरामाचे दर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. (नीतीश कुमार, DM, अयोध्या)
अयोध्येत जेवणाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येत अनेक ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सहा भोजनालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथून थेट विमानसेवा आहे लवकरच बंगळूरू आणि हैदराबाद येथून विमानसेवा सुरू होणार
अयोध्येसाठी इंटरनॅशनल फ्लाईट लखनौ आणि दिल्ली येथून येणार आहे
देशातील प्रत्येक राज्यातून अयोध्येसाठी ट्रेन आहे.
जटायू राजा दशरथाचा मित्र होता. जटायुने प्रभू श्रीरामाची मदत केली होती. राम मंदिरात जटायूची मूर्ती असणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जटायूच्या मूर्तीचे दर्शन घेणार आहे.
हनुमानाचे दर्शन घेतले नाही तर पुण्य मिळणार नाही. हनुमानाच्या परवानगीशिवाय प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद मिळत नाही (महंत राजू दास, हनुमानगढी, अयोध्या)
तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे राम मंदिरात देखील प्रसाद मिळणार आहे. हा प्रसाद 10 ते 15 दिवस टिकणारा आहे. मंदिरातून प्रसाद खरेदी करता येणार आहे (नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष, राम मंदिर निर्माण समिती)