एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: भगवा ध्वज हवा चिरत राम मंदिराच्या कळसावर जाऊन स्थिरावला; दैवी उर्जेने नरेंद्र मोदी सद्गतित; जोडलेले हात थरथरले, अंगावर काटा आणणारा Video

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राममंदिराच्या शिखरावर आज दिमाखात धर्मध्वज फडकला.

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील राममंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) शिखरावर आज (25 नोव्हेंबर) दिमाखात धर्मध्वज (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony) फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. 

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं (Ram Mandir Flag Hoisting Ceremony) बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर धर्मध्वज फडकला. कोविदार वृक्ष, तेजस्वी सूर्याची प्रतिमा चिन्हांकीत झालेला भव्य ध्वज विधीवत पूजन करून फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी आणि सरसंघचालकांनी एकत्र श्रीरामाचं पूजन करून ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणासाठी हजारो भाविक अयोध्येत जमले होते, प्रभू श्रीरामाचा जयघोष आणि मंत्रोच्चारांच्या साथीने मंदिरावर भव्य भगव्या रंगाचा धर्मध्वज फडकला.  

भगवा ध्वज हवा चिरत राम मंदिराच्या कळसावर जाऊन स्थिरावला-

राम मंदिराचा हा धर्मध्वज मंत्रघोषांच्या उच्चारात बटन दाबताच कळसाच्या दिशेने वर जाऊ लागला. हवेचा प्रचंड जोर असतानाही हा धर्मध्वज 191 फूट उंचावर असलेल्या राम मंदिराच्या कळसावर अचूकपणे जाऊन स्थिरावला.  पंतप्रधान मोदी आणि उपस्थित जनसमुदाय खाली उभे राहून डोळ्यांमध्ये हे दृश्य साठवत होता. मात्र, धर्मध्वज मंदिराच्या कळसावर स्थिरावला तेव्हा पंतप्रधान मोदी  यांचे मन दैवी भावनांच्या संचाराने अक्षरश: सद्गतित झाले. धर्मध्वज मंदिराच्या कळसावर पोहोचला तेव्हा खाली उभ्या असलेल्या नरेंद्र मोदींचे जोडलेले हात भावना आवेगाने थरथरताना दिसले. हे दृश्य पाहून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.

हा धर्मध्वज या प्रेरणेचे प्रतिक असेल- नरेंद्र मोदी (Narendra Modi Ram Mandir)

सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. सत्य हेच ब्रह्मस्वरुप आहे, सत्य हाच धर्म आहे. 'प्राण जाये पर वचन न जाये', हा संदेश  राम मंदिरावरील हा धर्मध्वज देईल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे, ज्याठिकाणी गरीबी नसेल, कोणी दु:खी किंवा लाचार नसेल, तिकडे कोणताही भेदभाव किंवा समस्या नसतील. हा धर्मध्वज या प्रेरणेचे प्रतिक असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

राम मंदिरावरील रामध्वजाचं वैशिष्ट्ये काय? (Ram Mandir Flag Hoisting Ceremony)

  1. 161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंचीची रामध्वज.
  2. रामध्वज जमिनीपासून 191 फूट उंचीची आहे.
  3. रामध्वज केशरी रंगाची, 11 फूट रुंद आणि 22 फूट लांब.
  4. बटन दाबताच रामध्वजा दोरीवरुन वरच्या टोकाला पोहचून ध्वज फडकला. 

असे बनले राम मंदिर- (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting)

9 नोव्हेंबर 2019- राम मंदिर निर्माणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, ट्रस्टद्वारे बांधकामाचे आदेश
5 फेब्रुवारी 2020- श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
5 ऑगस्ट 2020- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन 
20 ऑगस्ट 2020- राममंदिराचे काम प्रत्यक्षात सुरू 
22 जानेवारी 2024- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात राममूर्तीची प्रतिष्ठापना
5 जून 2025- राम मंदिराच्या दरबारात अन्य सात देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
25 नोव्हेंबर 2025- मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण

संबंधित बातमी:

Ram Mandir Dhwajarohan 2025: प्रतीक्षा संपली! अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाची स्थापना, पंतप्रधानांकडून ध्वजारोहण, काही क्षणचित्रे..

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget