एक्स्प्लोर

Ayodhya Case | अयोध्या प्रकरणाचा निकाल 17 नोव्हेंबरपूर्वी लागण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना त्यांचा युक्तिवाद करण्यासाठी किती दिवसात पूर्ण होईल, अशी विचारणा केली. त्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने युक्तिवादासाठी जास्तीत जास्त एक आठवडा लागेल अशी माहिती दिली.

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर देण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. तसेच गरज भासल्यास एक तास जास्त सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे.

अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी 6 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या सुनावणीचा आज 26 वा दिवस आहे. यामध्ये 16 दिवस हिंदू पक्षकारांनी आपली बाजू मांडली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी आतापर्यंत 10 दिवस आपली बाजू माडंली आहे.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी अयोध्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे किंबहुना तसा सुप्रीम कोर्टाचा प्रयत्न आहे.

सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना त्यांचा युक्तिवाद किती दिवसात पूर्ण होईल? अशी विचारणा केली. त्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने युक्तिवादासाठी जास्तीत जास्त एक आठवडा लागेल अशी माहिती दिली. त्यानंतर रामललाच्या वतीने युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी दोन दिवस लागतील, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व पक्षकारांनी आपली वेळ निश्चित केल्याने, निकालाची सुनावणी लवकरच पूर्ण होऊ शकेल, असं  स्पष्ट होऊ लागलं आहे.

"सर्व पक्षकारांचा युक्तिवाद 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळे लवकर या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. या प्रकरणाची सुनावणी सुरु असतानाही मध्यस्थी करण्यास आमची तयारी आहे", असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं आहे.

अयोध्या प्रकरणाची सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्यास त्यानंतर तीन-चार आठवड्यात निकालाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच अयोध्या प्रकरणाचा निकाल लागू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Yusuf Pathan NCPI: 'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Embed widget