एक्स्प्लोर
बुरख्याच्या आत चोरकप्पा, अचाट चोरी CCTV मध्ये कैद

औरंगाबाद: एका कापड दुकानात बुरखाधारी महिलांनी दुकानदाराला तब्बल 50 हजाराला चुना लावला. 2 महिलांनी अतिशय शिताफीनं दुकानतले कपडे लांबवले. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर या महिलांनी दुकानदाराला तुमचं दुकानं फार आवडल्याचा अभिप्रायही लिहून दिला. या महिलांची चोरी करण्याची पद्धत अचाट करणारी होती. या महिला कपडे जमिनीवर टाकायच्या. मग खाली वाकून स्वत:च्या बुरख्यात टाकायच्या. त्या बुरख्याला त्यांनी खास कप्पा करुन घेतला होता. त्या कप्प्यात कपडे टाकल्यामुळे सहज काहीही लक्षात येत नव्हतं. अशा पद्धतीने त्यांनी हातचलाखी करुन, कापड दुकानदाराला 50 हजार रुपयांना गंडा घातला आहे. ही सर्व चोरी सीसीटीव्हीत कैद झाली.
आणखी वाचा























